पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी ताबडतोब निर्णय घ्या : ॲड. नितीन लांडगे

पिंपरी : पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रशासनाने दिलेले आश्वासन अनेकदा फोल ठरले आहे. पुर्ण दाबाने व सुरळीत पाणी पुरवठा व्हावा हि सर्व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरातील सर्वच भागातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. यावर आयुक्तांनी ताबडतोब निर्णय घेऊन सर्व शहरातील पुर्ण दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करावा असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी बुधवारी दिले. बुधवारी (दि. 1 डिसेंबर) ॲड. नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्य प्रशासन भवन कै. मधुकरराव सभागृहात स्थायी समितीची 251 वी सभा झाली. या सभेत सुमारे 6 कोटी 77 लाख रुपये खर्चास मंजूरी देण्यात आली. हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची घोषणा करण्यासाठी बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराच्या महापौरांना निमंत्रण देण्यात आले नाही. याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘11 वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा 2021’ हि स्पर्धा 11 ते 22 डिसेंबर या काळात होणार आहे. पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे होणा-या स्पर्धेसाठी 32 लाख 25 हजार 974 रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. या स्पर्धेची घोषणा बुधवारी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त आणि संबंधित संस्थेच्या पदाधिका-यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली. परंतू यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या महापौरांना डावलण्यात आले असा प्रश्न ॲड. नितीन लांडगे यांनी उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट बाबत केंद्र व राज्य सरकारने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 92 टक्के नागरिकांनी पहिला आणि 60 ते 62 टक्के नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी. मास्क वापरावा आणि सामाजिक अंतर पाळावे असेहि आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केले. यामध्ये महापालिकेच्या विविध उद्यानांमध्ये 10 प्रकारची 57 खेळणी बसविण्यासाठी 83 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र. 16 मध्ये किवळे, शिंदेवस्ती व गुरुव्दारा परिसरात खडी मुरुम व बीबीएम पध्दतीने रस्त्याचे चर, खड्डे भरण्यासाठी 17 लाख रुपये, प्रभाग क्र. 18 मधील महापालिका इमारतींची देखभाल दुरुस्ती कामे करण्यासाठी 25 लाख रुपये, प्रभाग क्र. 16 मधील रावेत भागातील गुरुव्दारा परिसरातील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 17 लाख रुपये, तर प्रभाग क्र. 16 रावेत भागातील खडीमुरुम आणि बीबीएम पध्दतीने रस्त्याचे चर तसेच खड्डे भरण्यासाठी 17 लाख 45 हजार रुपये, प्रभाग क्र. 13 साईनाथनगर व प्रभागातील विविध ठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसविणे तसेच स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 28 लाख रुपये, प्रभाग क्र. 8 मधील जे ब्लॉक, एस ब्लॉक आणि इतर ठिकाणच्या रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी 52 लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र. 6 मधील धावडे वस्ती परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 52 लाख रुपये तर प्रभाग क्र. 12 मधील रुपीनगर तळवडे नव्याने होणा-या डी.पी. आणि इतर रस्त्यांवर दिवाबत्तीची व्यवस्था करण्यासाठी 24 लाख रुपये या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली. विषय पत्रिकेवरील एकुण 32 विषयांपैकी 27 विषय आणि ऐनवेळचे 8 असे एकुण 35 विषय या सभेत मंजूर करण्यात आले.
पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी ताबडतोब निर्णय घ्या : ॲड. नितीन लांडगे पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी ताबडतोब निर्णय घ्या : ॲड. नितीन लांडगे Reviewed by ANN news network on १२/०२/२०२१ ११:५९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".