सांगवीत सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून

पिंपरी : एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना सांगवीतील काटेपुरम चौकात शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, गोळीबारीच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. योगेश जगताप असे मृत्यू झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दत्त जयंतीनिमित्त योगेश जगताप याने काटेपुरम चौकात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी तो कार्यक्रमाच्या ठिकाणी आला होता. सकाळी साडेदहा वाजता एकाने त्याच्यावर फायरिंग केले. जगताप पळत सुटला, त्यांच्यात झटापट देखील झाली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. आरोपीने जगताप याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या असून पैकी दोन गोळ्या त्याला लागल्या. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान जगताप याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा बंदोबस्त करण्यात आला असून दंगल नियंत्रण पथक,सीआरपीएफचे पथक दाखल झाले आहे. परिसरात भीतीचे वातावरण असून दत्त जयंती निमित्त होणारे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये दोन आरोपी योगेश यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहेत. मयत योगेश जगताप आणि संशयित आरोपी दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. जगताप याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
सांगवीत सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून सांगवीत सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून Reviewed by ANN news network on १२/१८/२०२१ ०८:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".