पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सोमवारी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी नुकतेच शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते.
२६ ऑक्टोबरला सकाळी ते घरामध्ये तोल जाऊन पडले. यामुळे त्यांच्या डोक्याला इजा झाली होती. उपचारासाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीचे दोन दिवस त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. ते बोलत होते. मात्र त्यानंतर त्यांना न्युमोनिया झाला. त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
पुरंदरे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मान्यवर नेत्यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
त्यांच्या पश्चात अमृत आणि प्रसाद हे चिरंजीव तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२१ ०१:२१:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: