मुंबई : त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हा प्रश्न आहे. पण त्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये अशांतता पसरवणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये जे घडलं ती, हिंदुंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अब हिंदू मार नहीं खाएगा, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. १९९३ च्या दंगलीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बोटचेपी भूमिका घेतली असती, तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता, असेही त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
अमरावतीतील घटनेवर बोलताना पाटील पुढे म्हणाले की, "त्रिपुरामध्ये घटना काय घडली, हे नीट कुणालाही माहिती नाही. त्यासंदर्भात एक व्हिडिओ बनवून व्हायरल केला जातो. त्यानंतर अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये अशांतता पसरवली जाते. १५-२० हजार संख्येने रस्त्यावर उतरून माजी मंत्री जगदीश गुप्तांसह अनेकांची कार्यालयाची तोडफोड करायची. याचा काय संबंध आहे?
नेत्यांच्या धरपकडीवर बोलताना पाटील म्हणाले की, "अमरावती, नांदेड,मालेगाव मध्ये शुक्रवारी जे घडलं, त्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात आहे, त्यांना आधी अटक करा. नांदेडमध्ये भाजपा जिल्हाध्यक्षांनी बंदची हाक दिली आहे. त्या बंदवर आक्षेप घेणाऱ्यांनी शुक्रवारच्या घटनेतील १०० जणांना अटक केली आहे का? हे आधी स्पष्ट करावे, १५-३० हजारचा जमाव रस्त्यावर उतरून अशांतता पसरवतो. तेव्हा पोलिसांचे गुप्तहेर खातं करतं, तरी काय?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अब हिंदू मार नहीं खाएगा! : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२१ ०१:१९:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: