पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप



पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे.अतिरिक्त आयुक्त (दोन) पदी जितेंद्र वाघ रुजू झाल्यामुळे हे फेर वाटप करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अतिरिक्त आयुक्त (एक) विकास ढाकणे यांच्याकडे १७ विभाग देण्यात आले आहेत. तर अतिरिक्त आयुक्त (दोन) यांच्याकडे १३ विभाग देण्यात आले आहेत. अतिरिक्त आयुक्त (तीन) उल्हास जगताप यांच्याकडे पुर्वीचेच दहा विभाग कायम ठेवले आहेत. यापूर्वी अतिरिक्त आयुक्त दोन यांच्याकडे असलेला आरोग्य विभाग अतिरिक्त आयुक्त (एक) विकास ढाकणे यांच्याकडे ठेवण्यात आला आहे.
आयुक्तांकडील विभाग
आयुक्तांनी स्वतःकडे विशेष प्रकल्प (स्मार्ट सिटी, अमृत) आणि लेखा विभाग ठेवला आहे.
विकास ढाकणे – अतिरिक्त आयुक्त (एक) यांच्याकडील विभाग :-
प्रशासन, स्थापत्य मुख्यालय स्थापत्य (उद्यान), स्थापत्य (क्रीडा), स्थापत्य (प्रकल्प), शिक्षण विभाग (प्राथमिक), माध्यमिक शिक्षण विभाग, अग्निशमन विभाग, उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग (स्वच्छ भारत, महाराष्ट्र अभियानासह), क्रीडा विभाग, बांधकाम परवानगी विभाग, माहिती व तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय, यंशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व पशुवैद्यकीय विभाग.
जितेंद्र वाघ – अतिरिक्त आयुक्त (दोन) यांच्याकडील विभाग :-
नगरचना, मध्यवर्ती भांडार विभाग, विद्युत मुख्य कार्यालय (अणूविद्युत व दूरसंचारसह), नागरवस्ती विकास योजना विभाग, बीआरटीएस प्रकल्प, निवडणूक, जनगणना (आधारसह), कर आकारणी विभाग व करसंकलन, आकाशचिन्ह व परवाना विभाग, स्थानिक संस्था कर, अतिक्रमण मुख्य कार्यालय (अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभाग), भूमि आणि जिंदगी (विशेष नियोजन प्राधिकरण) व कायदा विभाग.
उल्हास जगताप – अतिरिक्त आयुक्त (तीन) यांच्याकडील विभाग :-
सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणारे सर्व विभाग, झोनिपू, झोनिपू (स्थापत्य), नागरी सुविधा केंद्र, सभा शाखा, आयटीआय मोरवाडी व कासारवाडी, कार्यशाळा विभाग, अभिलेख कक्ष, कामगार कल्याण विभाग, माहिती व जनसंपर्क विभागाचे कामकाज देण्यात आले आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ ०१:२३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".