शाहरुखच्या मुलाला जामीन मिळत नाही म्हणून एव्हढा तडफडाट का? : आमदार चंद्रकांत पाटील



पिपरी : ’महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. कारवाई करत नाही मात्र अभिनेता शाहरूख खानच्या मुलाचा यांना पुळका. यांचे अल्पसंख्याक मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर बोलतात. या सर्व प्रकरणामागील पाळंमुळं काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही’, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी लगावला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पिंपरी चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आर्यन खान, जरंडेश्वर साखर कारखाना, आगामी महापालिका निवडणुक यावरील प्रश्नांवर उत्तर देताना, महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला.
पाटील यावेळी म्हणाले की, ’मला एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडला आहे की, एवढा यांना शाहरूख खानच्या मुलाचा पुळका का आला? म्हणजे नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर म्हणणार, मग महाराष्ट्र सरकार आता काय सर्वोच्च न्यायालयात जाणार. महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. शाहरुख खानच्या मुलाला जामीन मिळत नाही, एक बर झालं हायकोर्टावर यांचा संशय नाही. अन्यथा ते म्हणाले असते हायकोर्ट देखील यांनी मॅनेज केलं. पाळंमुळं काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही. हे सर्व बरोबर नाही.’ असे चंद्रकात पाटील म्हणाले.
चौकट
या शहरात आम्हाला हरवणे सोपे नाही
पिंपरी चिंचवडमध्ये खुद्द शरद पवार यांना लक्ष घालण्याची पाळी आली.अजित पवार, अमोल कोल्हे हे देखील शहरात लक्ष घालत आहेत, याचाच अर्थ या शहरात आम्हाला हरवणं सोपं नाही. आम्ही आमचे आमचे आमदार, नगरसेवक कसे नीट राहतील याची काळजी घेण्यास समर्थ आहोत. त्याची काळजी अन्य कोणी करण्याची गरज नाही. अशी तिरकस प्रतिक्रिया पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या दौर्याविषयी बोलताना दिली.

 

शाहरुखच्या मुलाला जामीन मिळत नाही म्हणून एव्हढा तडफडाट का? : आमदार चंद्रकांत पाटील शाहरुखच्या मुलाला जामीन मिळत नाही म्हणून एव्हढा तडफडाट का? : आमदार चंद्रकांत पाटील Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ १२:४४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".