पिंपरी चिंचवडमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन



पिंपरी : देशात महागाईने कळस गाठला असून याला केंद्रसरकार जबाबदार आहे असा आरोप करत सोमवारी पिंपरी चिंचवड शहरात मोर्चा काढला या मोर्चाची सांगता पिंपरी चौकात निदर्शने करून करण्यात आली.
या मोर्चात खासदार-श्रीरंग बारणे, प्रदेश संघटक गोविंद घोळवे, शहर प्रमुख-अॅड. सचिन भोसले, मा. आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संपर्क प्रमुख वैशाली सुर्यवंशी, जिल्हा संघटीका सुलभा उबाळे, शैलजा खंडागळे, वैशाली मराठे, उपजिल्हा प्रमुख-निलेश मुटके, युवासेना शहर संघटक विश्वजित बारणे, अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्षदस्तगिर मणियार, डॉ. जावेद अत्तार, शहर संघटक संपत पवार, रोमी संघू, भाविक देशमुख, बशीर सुतार, सचिन सानप, विशाल यादव, विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, अनंत कोरहाले, महिला संघटीका अनिता तुतारे, कल्पना शेटे, शशिकला उभे, विधानसभा संघटक माऊली जगताप, निलेश हाके, पंकज दिक्षित, उपशहर प्रमुख तुषार नवले, पांडुरंग पाटील, अमोल निकम, नवनाथ तरस, हरेश नखाते, संतोष पवार, सुधाकर नलावडे, अनिल सोमवंशी, शैलेश मोरे, राजेंद्र तरस, रूपेश कदम, नगरसेवक अमित गावडे, मिनल यादव, रेखा दर्शले, अश्विनी वाघमारे, व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
मोरवाडी चौकातील अहल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास हार घालून मोर्चाची सुरुवात झाली.बैलगाडी, गॅस सिलेंडरसह हातात फलक घेऊन शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. डॉ. आंबेडकर चौकात मोर्चा आल्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी चूल मांडून तेथे स्वयंपाक करून केंद्रासरकारचा निषेध केला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

 

पिंपरी चिंचवडमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन पिंपरी चिंचवडमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ १२:४६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".