पिंपरी चिंचवडमध्ये भारतातील सर्वात मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’



पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चचवडमध्ये भारतातील सर्वात मोठी रिव्हर सायक्लोथॉन आयोजित केली आहे. या सायक्लोथॉनच्या माध्यमातून इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पर्यावरण प्रेमी संस्था आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने प्रत्येकवर्षी रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात येते.
अविरत श्रमदान संस्थेचे संस्थापक सदस्य डॉ. निलेश लोंढे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरण क्षेत्रात काम करणार्याविविध संस्था संघटनांच्या माध्यमातून येत्या 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता, भोसरीतील गावजत्रा मैदानावर रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून या सायक्लोथॉनचे आयोजन केले जाते. कोरोना काळात गतवर्षी घेतलेल्या सायक्लोथॉनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, असेही डॉ. लोंढे यांनी सांगितले.
अशी असेल सायक्लोथॉन
रिव्हर सायक्लोथॉन तीन टप्पयात होणार आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 किमी मार्यादा आहे. अंकुशराव लांडगे सभागृह- जय गणेश साम्राज्य- अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग असेल. दुसरा टप्पा 15 किमी अंतराचा असून, अंकुशराव लांडगे सभागृह- जय गणेश साम्राज्य क्रांती चौक- जय गणेश साम्राज्य- अंकुशराव लांडगे सभागृह असा राहणार आहे. तसेच, 25 किमी अंतराच्या सायक्लोथॉनसाठी अंकुशराव लांडगे सभागृह- स्पाईन रोड- क्रांती चौक साने चौक, कृष्णानगर- अंकुशराव लांडगे सभागृह असा राहणार आहे. विशेष म्हणजे, सहभागी होणार्या प्रत्येक सायकलपटूला टी-शर्ट, हॅवर सॅक, वॉटर बॉटल आणि मेडल मोफत देण्यात येणार आहेत.
इच्छुकांना नावनोंदणीचे आवाहन
इंद्रायणी नदी स्वचछता अभियानाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या या सायक्लोथॉनमध्ये पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी जास्तीत-जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी गणेश पानसरे (968991535) , बापु शिंदे (9552187778) यांच्याशी संपर्क साधवा.

 

पिंपरी चिंचवडमध्ये भारतातील सर्वात मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ पिंपरी चिंचवडमध्ये भारतातील सर्वात मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ ०१:१८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".