पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू



पिंपरी : भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष व काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेस मध्ये प्रवेश केला शहराध्यक्ष कैलास कदम यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले
पक्ष प्रवेश केलेल्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे झोपडपट्टी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ जगताप, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा छाया देसले, काळेवाडी भागातील रॅायल फांऊडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी नांगरे व ख्रिश्चन एकता मंच संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पठारे यांचा समावेश आहे.त्यांनी आपल्या समर्थकांसहित काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा खराळवाडी पिंपरी येशील हिंद कामगार संघटनेच्या हॅालमध्ये पार पडला.
शहराध्यक्ष कैलास कदम यांनी“आपला सर्वांचा पक्षात मानसन्मान राखला जाईल व नव्याने प्रवेश करणा-या सर्वांना पक्ष संघटनेत योग्य स्थान देऊन निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान दिले जाईल असे आश्वासन प्रत्यक्ष प्रवेश करणाऱ्यांना दिले. कदम पुढे म्हणाले येणारा काळ हा अत्यंत महत्वाचा असून त्यात आपले सर्वांचे
योगदान शहरात सत्ता परिवर्तनाच्या लढ्यात महत्वपूर्ण राहील याचा मला विश्वास आहे आपले पक्षात स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे.”
या प्रसंगी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिपंरी चिचंवड काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, शहर काँग्रेस एस सी विभागाचे शहराध्यक्ष बाबा बनसोडे, एस सी विभागाचे शहर उपाध्यक्ष विजय ओव्हाळ, आबा खराडे, माऊली मलशेट्टी, बबलू तामचीकर, नाना गायकवाड, दिपक गंगावणे, बबलू जोसेफ, बाबू राठोड, प्रथम नांगरे, प्रतिक धावारे, अल्ताफ शेख आदि उपस्थित होते.

 

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ १२:४८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".