खेडमध्ये एसटी संपामुळे खासगी वडापवाल्यांची लूट



खेड:एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे  सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र तातडीच्या कामासाठी तालुका मुख्यालय असलेल्या खेड शहरात वडापने प्रवास  करणाऱ्या नागरिकांना नियमित भाड्यापेक्षा दीड पट अधिक भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. एसटीच्या संपामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनचाकी व चारचाकी छोट्या वाहनचालकांनी पर्वणी समजून प्रवाश्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू केला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात गेली अनेक वर्षे वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध वाहतूक सुरू आहे. मात्र संप काही केल्या मिटत नसल्याने अखेर शाससाने यावर उपाय म्हणून आता खासगी वाहनचालकांना एसटी बसस्थानकातुन प्रवासी वाहतुकीसाठी अधिकृत परवानगी दिली आहे. शालेय बस, कंपनीच्या बस आणि खासगी बससह मालवाहतूक खासगी वाहनांना प्रवाशांची ने आण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या संधीचा उपयोग करून वडाप चालकांनी  नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून संपाच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत वडाप वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची मनमानी सुरू झाली आहे. प्रवाश्यांकडे याबाबत चौकशी केली असता सवेणी ते खेड या सुमारे ८ किमीच्या प्रवासासाठी वडाप चालक कोरोनाच्या कालावधीपासून नियमितपणे २० रुपये घेतात मात्र गेल्या दोन दिवसात हा दर ३० रुपये करण्यात आला आहे. दरम्यान शासनाने खासगी वाहनचालकांना एसटी बसस्थानकात वाहने उभी करण्यास परवानगी दिली असली तरी खेड बसस्थानकात एकही खासगी वाहन प्रवासी वाहतूक करताना आढळून आले नाही.  शासकीय नियम पायदळी तुडवून अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वडापचालकांनी एसटी बसस्थानकापासून शंभर मिटर दूर राहून हा लुटमारीचा व्यवसाय सुरू केला आहे. राज्य सरकारने या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समितीची स्थापना केली असली तरी कोणतीही भीड न ठेवता वडापवाले प्रशासनाच्या नाकावर टिच्चून प्रवाश्यांची लूट करीत आहेत.  

खेडमध्ये एसटी संपामुळे खासगी वडापवाल्यांची लूट खेडमध्ये एसटी संपामुळे खासगी वडापवाल्यांची लूट Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ १२:३३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".