भगव्या वादळानेच विरोधकांना चोख उत्तर - आमदार योगेश कदम




खेड: शिवसेना व  युवासेनेच्या भगव्या वादळानेच विरोधकांना उत्तर मिळाले असेल, असे प्रतिपादन दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी येथे केले. शहरातील कै. जयश्री तोडकरी वैश्य भवन सभागृहात रविवारी  १४ रोजी आयोजित शिवसेना तालुका कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

खेड येथे तालुका शिवसेनेच्या मेळाव्यात आमदार कदम म्हणाले, आज मी शिवसैनिक म्हणून बोलणार आहे. राज्यात महाविकास आघाडी झाली म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले मात्र जसजश्या निवडणुका जवळ येतात तश्या आपल्या विरोधकांच्या सोंग बाहेर येऊ लागतात. सन १९९० पासून सन्माननीय रामदास कदम यांनी केलेली शिवसेनेची केलेली बांधणी मी लहानपणा पासून पाहिली आहे. त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांची आजची स्थिती काय आहे हे जनतेला माहिती आहे. राष्ट्रवादीत गेलेल्याची पक्षात काय किंमत आहे हे त्यांना माहिती आहे. त्यांनी केलेल्या आरोपांचा मला व रामदास भाईंना कोणताच फरक पडत नाही. रामदास भाईबद्दल बोलायची पात्रता कोणाचीच नाही. आज जे लोक शिवसेना सोडून गेले आहेत ते ओवाळून टाकलेले आहेत, अशी टीका यावेळी आ. कदम यांनी केली. यावेळी व्यासपीठावर ना.उदय सामंत, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख विजय जाधव, सभापती मानसी जगदाळे, जीवन आंबरे, विजय कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय मोदी यांनी केले.

यावेळी आ.कदम म्हणाले, शिवसेनेच्या नेत्याच्या घरी आम्ही जन्म घेतला आणि तेव्हा पासूनच आम्हाला आमच्या वडिलांनी बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू पाजून मोठे केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सन्माननीय बाळासाहेबांनी आमच्यात रुजवले आहेत. जात-पात-धर्म आणि यांचं राजकारण करत जे पक्ष सोडून गेले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पक्षात राहून त्यांनी किती आत्मसात केले हे लक्षात येते. २०१४ मध्ये एकदा दापोली मतदारसंघावरील भगवा उतरला होता मात्र  शिवसैनिक आता पुन्हा भगवा खाली उतरू देणार नाहीत. खेड नगर पालिकेत विरोधकांनी खेळ करून ठेवला आहे. जिल्हापरिषद व पंचायत समिती बाबत विरोधकांनी विसरून जावं तो आपला बालेकिल्ला आहे आणि राहील, असा विश्वास आ.कदम यांनी व्यक्त केला.

खडी क्रशरचा उपयोग करून मतदान करून घेण्याचे व  ग्रामीण भागात जनतेची फसवणूक करण्याचे  दिवस संपले आहेत. अशा पध्दतीने जनतेची फसवणूक करणाऱ्यांना गेल्या निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवला आहे. खेड तालुक्यात शिवसेनेत खिंडार पाडण्याचा प्रयत्न कोणी करू नये तो कदापि यशस्वी होणार नाही. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून आपण जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे, असे ते म्हणाले.

भगव्या वादळानेच विरोधकांना चोख उत्तर - आमदार योगेश कदम भगव्या वादळानेच विरोधकांना चोख उत्तर - आमदार योगेश कदम Reviewed by ANN news network on ११/१६/२०२१ १२:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".