आमदार लांडगे यांच्यामुळे लोकसेवेची प्रेरणा अन् वसा : सचिन तापकीर

पिंपरी : भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यामुळे लोकसेवा करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या माध्यमातून समाजसेवेचा हा वसा आम्ही जपणार आहोत, अशा भावना भाजपा कोषाध्यक्ष सचिन तापकीर यांनी व्यक्त केल्या. चऱ्होली येथे आमदार महेश लांडगे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत लांडगे यांच्या हस्ते रुग्णावाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी महापौर तथा नगरसेवक नितीन काळजे, भाजपा कोषाध्यक्ष सचिन तापकीर व स्वीकृत नगरसेविका साधना तापकीर, अजित बुर्डे, भाऊशेठ रासकर, शिवाजी तापकीर, शहाजी तापकीर आदी उपस्थित होते. भाजपा कोषाध्यक्ष सचिन तापकीर म्हणाले की, आमदार लांडगे यांनी नेहमीच लोकोपयोगी व सामाजिक कार्यक्रमासाठी पाठबळ दिले आहे. त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या पावलावर चालून लोकसेवेचा वसा जपत आहोत. कोरोना काळात वैद्यकीय सेवेचे महत्व अधोरेखित झाले आहे. अद्यापही कोरोना पूर्णपणे संपला नसून आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. रुग्णवाहिकांचा तुटवडा असल्याने अनेकदा जखमी किंवा गरजू रुग्णांना मदत मिळत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली. * सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न… कोरोना काळात आमदार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जीवाची परवा न करता मदतकार्य तसेच विविध उपक्रम राबवले आहेत. जन्मदिनी अनावश्यक खर्च टाळून विधायक आणि लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या होत्या. यामुळे सामजिक बांधिलकी आणि सध्याची गरज याची सांगड घालत रुग्णवाहिका लोकापर्णासह अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच लोकसेवेचा वसा असाच सुरू राहणार असल्याचे मत सचिन तापकीर यांनी यावेळी व्यक्त केले.
आमदार लांडगे यांच्यामुळे लोकसेवेची प्रेरणा अन् वसा : सचिन तापकीर आमदार लांडगे यांच्यामुळे लोकसेवेची प्रेरणा अन् वसा : सचिन तापकीर Reviewed by ANN news network on ११/२९/२०२१ ११:२३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".