मोहन जोशी, डॉ. माधवी वैद्य यांच्याहस्ते पुस्तक कट्टयाचे उद्घाटन

पुणे : गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज ‘ आयोजित 'गंगोत्री रिडेव्हलपमेंट फेस्टिवल ' अंतर्गत रविवारी 'सुह्रद' या गृहप्रकल्पाच्या ' सुहृद खुला मंच ( अॅम्फी थिएटर ) आणि पुस्तक कटट्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, डॉ. माधवी वैद्य, शर्वरी जमेनीस यांच्या उपस्थितीत झाले. 'घर संकल्पनेला अनुसरून ' रंगसंध्या ' हा काव्य ,संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . सुह्रद सोसायटी, मनोहर मंगल कार्यालयासमोर, नळस्टॉप ( कर्वेनगर ) येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. इमारतींची टेरेस धूळ खात पडून न राहता तेथे सांस्कृतिक कट्टे, वाय फाय झोन, टेरेस गार्डन अशा सुविधा निर्माण कराव्यात ,अशी गंगोत्री होम्सची संकल्पना आहे. ' सुह्रद खुला मंच ' याच संकल्पनेतून तयार करण्यात आला आहे. घर आणि नात्यांवर आधारित डॉ. माधवी वैद्य निर्मित 'रंग संध्या' हा काव्य -स्वर असा सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी सादर करण्यात आला. घर ' विषयक कविता, गीते, गाणी सादर करण्यात आलं.शर्वरी जमेनीस, धीरेश जोशी त्यात सहभागी झाले. खेडयामधले घर कौलारू, या सुखांनो या,तुझ्या वंदितो पाऊलास ' यासारख्या गीतांनी उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीने उपस्थित रसिकांची मने जिंकली. गंगोत्री ' तर्फे राजेंद्र आवटे, गणेश जाधव, मकरंद केळकर यांनी स्वागत केले. गृहबांधणी विषयक प्रदर्शन सकाळी 10 पासून सायंकाळी ९ पर्यंत मनोहर मंगल कार्यालय येथे सुरू होते. पुणेकरांनी तेथेही उपस्थित राहून पुनर्विकास विषयक माहिती घेतली. वाढत्या पुण्याच्या नगर नियोजनात महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या रिडेव्हलपमेंट ( पुनर्विकास ) विषयावर सर्वंकष विचार मंथन करण्याकरिता ‘गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज ‘ यांच्यातर्फे २६ ते २८ नोव्हेंबर रोजी 'गंगोत्री रिडेव्हलपमेंट फेस्टिवल ' चे आयोजन करण्यात आले आहे. गृह बांधणी विषयक प्रदर्शन, परिसंवाद, घर संकल्पनेला धरून काव्य आणि संगीत कार्यक्रम असे या फेस्टिवलचे स्वरूप आहे . त्या अंतर्गत हे कार्यक्रम पार पडले, त्या सर्व कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला.
मोहन जोशी, डॉ. माधवी वैद्य यांच्याहस्ते पुस्तक कट्टयाचे उद्घाटन मोहन जोशी, डॉ. माधवी वैद्य यांच्याहस्ते पुस्तक कट्टयाचे उद्घाटन Reviewed by ANN news network on ११/२९/२०२१ ११:२८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".