आळंदीत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कडून दर्शनबारीची पाहणी

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहाळ्यांतर्गत कार्तिकी यात्रा २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२१ या कलावधीत होत आहे. यानिमित्त लाखो भाविक आळंदीत येणार असून भाविक, नागरिक व मंदिर परिसर सुरक्षिततेसाठी आळंदीत विविध उपाय योजना पोलिस प्रशासनाकडून केल्या जात आहेत. या कामाची पाहणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आळंदीस सद्दिच्छा भेट देवून बुधवारी ( दि. २४ ) पाहणी केली. या दरम्यान येथील पोलिस प्रशासनाचे कामाची माहिती घेत त्यांनी पाहणी केली. यावेळी पोलीस आयुक्त मंचक इप्पर, दिघीचे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, आळंदी देवस्थान प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ. अभय टिळक, अॅड विकास ढगे पाटील, आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, व्यवस्थापक माऊली वीर,पोलिस निरीक्षक रमेश पाटील, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे आदिसह पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते,
आळंदीत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कडून दर्शनबारीची पाहणी आळंदीत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कडून दर्शनबारीची पाहणी Reviewed by ANN news network on ११/२५/२०२१ ०९:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".