पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची मागील आठवड्यातील तहकूब बैठक आणि चालू आठवड्यातील बैठक बुधवारी पार पडली. या यामध्ये एकूण 74 विषयांपैकी 72 विषयांतर्गत 198 कोटी 77 लाख 80 हजार 661 रुपयांच्या विकासकामांना स्थायीने अनुमती दिली.
महापालिकेच्या सर्व शाळात भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत दर्शनीयस्थानी बसवण्यात यावी असे आदेश या बैठकीत सभापती नितीन लांडगे यांनी प्रशासनाला दिले. त्यावर 26 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले.
शहरातील नागरिक व नियमित पाणी वापरून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रासले असून त्यांनी याबाबत नगरसेवकांना जाब विचारणे सुरु केल्यामुळे नगरसेवकही त्रस्त झाले आहेत त्यातच निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. नागरिकांच्या नाराजीचा परिणाम निवडणूक निकालावर होऊ शकतो याची जाणीव झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह आयुक्तांना धारेवर धरले.
महापालिकेने जलसंपदा विभागाकडे शंभर एम एल डी अतिरिक्त पाण्याची मागणी केली असून तो कोटा वाढवून मिळाल्यावर आणि भामा आसखेड प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने या सभेत देण्याच्या बैठकीत देण्यात आली.
महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करत आहे. ही कारवाई एकतर्फी होत असून फक्त भाजीपाला विक्रेत्यांना त्रास दिला जात आहे असा आरोप या बैठकीत काही नगरसेवकांनी केला. आणि, एकतर्फी कारवाई करण्यात येऊ नये अशी आग्रही मागणी केली.
स्थायीच्या बैठकीत 199 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता
Reviewed by ANN news network
on
११/२५/२०२१ ०९:३४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: