पिंपरी : 'माझे नगरसेवक पद रद्द झाल्याचे वृत्त धादांत खोटे असून, ज्यांच्या पत्नीचा मी निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन माझ्याविरुद्ध बदनामीची मोहीम चालविली आहे. हिम्मत असेल तर त्यांनी माझे पद घालवून दाखवावे' असे आव्हान नगरसेविका सुलक्षणा धर यांनी गुरुवारी त्यांच्या विरोधकांना दिले.
धर यांचे पद रद्द झाल्याचे वृत्त आज गुरुवारी अनेक प्रसार माध्यमामध्ये झळकले. त्यामुळे त्या या विषयावर माध्यमांशी बोलत होत्या.
ोरोना काळात धर यांचे पती आणि बंधू संचालक असलेल्या कंपनीकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेने निविदा न मागवता थेट मास्क खरेदी केली होती. याप्रकरणी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून उच्च न्यायालयाने पुणे विभागीय आयुक्तांना या प्रकरणाची सुनावणी घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीत त्यांना या प्रकरणात दिसून अनियमिततेबाबत सकृतदर्शनी सहभाग दिसत नसला तरी त्या पदावर राहण्यास अनर्ह होण्यास पात्र आहेत अशी आपली धारणा असल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी आपल्या निकालात नोंदविला आहे. मात्र यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका हे लोकांना अद्यापही कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. तसेच आपल्याला या आदेशाची प्रत अद्यापही मिळाली नसल्याचे धर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हिम्मत असेल तर माझे नगरसेवक पद घालवून दाखवावे : सुलक्षणा धर यांचे विरोधकांना आव्हान
Reviewed by ANN news network
on
११/२५/२०२१ ०९:३९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: