पुणे : पुणे शहर हद्दीत व्यावसायिकांना टार्गेट करून जबरी चोरी आणि दरोडे टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे. स्वारगेट हद्दीतील सॅलेसबरी पार्क परिसरात एका व्यावसायिकावर धारदार हत्याराने वार करून ५ लाख रुपयांची रोकड ज्युनिअर बॅगेसह हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्याचा सखोल तपास करताना पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत याच टोळीने मार्केटयार्ड परिसरातील ३० लाखांच्या दरोड्याचा गुन्हाही उघडकीस आणला आहे. चोरांकडून गुन्ह्यातील लाटलेल्या रकमेतून खरेदी करण्यात आलेली महागडी कार, दुचाकी, सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोलीवाला भवन, सॅलेसबरी पार्क येथे एक व्यावसायिक ५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जात असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांचा पाठलाग केला. संगनमताने त्यांच्यावर धारदार लोखंडी हत्याराने प्राणघातक वार करत जखमी केले आणि ५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) आणि हत्यार कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी तपास पथकाला तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास पथकातील सहायक निरीक्षक स्वप्निल शेळके, उपनिरीक्षक बाळू शिरसट आणि अंमलदार अक्षय भोगे यांनी मार्केटयार्ड, बिबवेवाडी, वानवडी, कोंढवा, हडपसर, मगरपट्टा सिटी, केशवनगर व मुंढवा परिसरातील तब्बल एक महिन्याचे ३०० ते ३५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपींची ओळख पटवून मुंढवा परिसरातून एकास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी यश प्रवीण सोनवणे (वय २४ वर्षे, रा. मांजरी, पुणे) आणि निहाल नवनाथ अडागळे (वय १९ वर्षे, रा. मुंढवा, पुणे) यांच्यासह त्यांच्या साथीदारांना अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या कसून चौकशीत या चोरांनी केवळ ५ लाखांचा प्रयत्नच नव्हे, तर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मार्केटयार्ड रोडवर एका व्यापाऱ्याचे ३० लाख रुपये रोख असलेली बॅग दरोडा टाकून चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून पोलिसांनी जबरी चोरी आणि दरोड्यात वापरलेली वाहने, कपडे, मोबाईल तसेच दरोड्याच्या काळ्या पैशातून खरेदी केलेली १ आय-२० कार, १ बुलेट दुचाकी, ॲपल कंपनीचा १८ प्रो मोबाईल, ४.५ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे तोडे, २ ॲपल वॉच, एक लेडीज वॉच आणि ६ लाख ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कामगिरी अप्पर आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, उपायुक्त (परिमंडळ २) मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त (स्वारगेट विभाग) गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम, गुन्हे निरीक्षक विकास भारमळ, प्रदीप सिंग सिसोदे यांच्या सुचनेनुसार सहायक निरीक्षक स्वप्निल शेळके, उपनिरीक्षक बाळू शिरसट, अंमलदार प्रदीप शिंदे, किरण रघतवान, अक्षय भोगे, रमेश चव्हाण, नितीन क्षीरसागर, सोमनाथ बटुळे, युवराज राठोड, रोहित पोवार व करण ढापकर यांनी पार पाडली.
Labels: Pune Police, Swargate Police Station, Armed Robbery Pune, EOW Pune, Cash Theft Recovery, Crime News Maharashtra, Yash Sonawane, Nihal AdagaleSearch Description: Read the detailed news report on Swargate police arresting notorious robbers who attacked a merchant for cash and confessed to a massive Rs 30 lakh heist in Pune.
Hashtags: #PunePolice #SwargatePolice #RobberyArrest #CrimeNews #PuneUpdates #LawAndOrder #MaharashtraPolice #Investigation
व्यापाऱ्यावर धारदार हत्याराने वार करून ५ लाखांची रोकड हिसकावणारे सराईत चोरटे जेरबंद!
Reviewed by ANN news network
on
११/०३/२०२६ १०:५९:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०३/२०२६ १०:५९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: