पुणे : पुणे शहर हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आणि तरुणाईला विळखा घालणाऱ्या तस्करांविरोधात गुन्हे शाखेने मोहीम अधिक तीव्र केली आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकच्या पथकाने मुंढवा परिसरातील शरदनगर गायरान वस्तीत सापळा रचून केलेल्या धडक कारवाईत तब्बल १ लाख ५१ हजार २५० रुपये किमतीच्या ३ किलो २५ ग्रॅम गांजासह एका तस्कराला जेरबंद केले आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर ३० ऑक्टोबर २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक एकच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व पथक पुणे शहर हद्दीत गस्त घालत असताना, अंमलदार संदीप शिर्के यांना माहिती मिळाली की, मुंढवा येथील शरदनगर गायरान वस्तीमधील सर्व्हे नंबर ६, प्लॉट नंबर १७१ परिसतात एकजण गांजाची विक्री करण्यासाठी उभा आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून पथकाने तात्काळ घटनास्थhळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर राजेंद्र तोरसकर यांच्या गोठ्या समोरील सार्वजनिक कच्च्या रस्त्यावर एक संशयित इसम हातात निळ्या रंगाची पिशवी घेऊन उभा असल्याचे दिसून आला. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन नाव-पत्ता विचारला असता त्याने आपले नाव सनी शाम गुमाने (वय २७ वर्षे, रा. केशवनगर, गायरान वस्ती, मुंढवा, पुणे) असल्याचे सांगितले. पंचांसमक्ष त्याच्या अंगझडती घेतली असता त्याच्याकडील निळ्या रंगाच्या पिशवीत बिया, बोंड व देटासह असलेला ३ किलो २५ ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा आढळून आला. तसेच त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा एक मोबाईल हँडसेट असा एकूण १ लाख ६१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अंमलदार संदीप शिर्के यांच्या फिर्यादीवरून मुंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट कलम ८ (क), २० (ब)(ii)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई अप्पर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपआयुक्त हसन गौहर, आणि सहायक आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक एकच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक योगेश कोतकर, आशा भिंगारे, सहायक फौजदार विठ्ठल साळुंखे, अंमलदार संजय राजे, निलेश जाधव, अतुल क्षीरसागर, तुषार साळुंखे, किरण जाधव, विशाल भिलारे, अविनाश रेडके, संदीप शिर्के, प्रेमा धारुरकर, मंगेश गुंड व अक्षय शिर्के यांनी पार पाडली आहे.
Labels: Pune Police, Anti Narcotics Cell Pune, Mundhwa Police Station, Ganja Seizure Pune, Trupti Sonawane, NDPS Act Maharashtra, Pune Crime News, Illegal Drugs India
Search Description: Read the detailed news report on Pune Crime Branch Anti Narcotics Cell Unit 1 arresting a peddler with over 3 kg of ganja worth Rs 1.51 lakh in Mundhwa.
Hashtags: #PunePolice #AntiNarcoticsCell #Mundhwa #GanjaSeizure #PuneCrime #NDPSAct #CrimeNews #MaharashtraPolice
मुंढवा परिसरात १ लाख ५१ हजार रुपये किमतीच्या गांजासह एका तस्कराला अटक!
Reviewed by ANN news network
on
११/०३/२०२६ ११:११:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०३/२०२६ ११:११:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: