बनावट नोटा तयार करणारी आंतरजिल्हा टोळी अटकेत


पुणे: भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या ५०० रुपयांच्या ५ लाख ६४ हजार रुपये मुल्याच्या बनावट नोटा जप्त करत विश्रामबाग पोलिसांनी एका चार जणांच्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद केले आहे. सलमान जैनद्दीन राजे (वय ३०, रा. दौंड, पुणे), शाफाज फिरोज अन्सारी (वय ३०, रा. नालासोपारा, ठाणे), विशाल विलास गलांडे (वय ३७, रा. माण, सातारा) आणि अभिजीत रावसाहेब कांबळे (वय ३०, रा. शिरोळ, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची नावे आहेत.

महात्मा फुले मंडईच्या पाठीमागील बाजूस म्हसोबा मंदिरासमोर एका संशयित इसमाकडे बनावट नोटा असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत १४ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सलमान राजे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ८०५ नकली नोटा (किंमत ४,०२,५०० रुपये) मिळून आल्या. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सातारा, कोल्हापूर आणि ठाण्यात धाडी

मुख्य आरोपी सलमान राजे याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याच्या इतर तीन साथीदारांची नावे समोर आली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सातारा, कोल्हापूर आणि नालासोपारा (ठाणे) येथे छापा टाकून शाफाज अन्सारी, विशाल गलांडे व अभिजीत कांबळे या तिघांनाही अटक केली. आरोपी शाफाज अन्सारी याच्या घरातून ५०० रुपयांच्या ३२३ बनावट नोटा (किंमत १,६१,५०० रुपये) हस्तगत करण्यात आल्या.

पोलिसांनी आरोपींकडून एकूण १,१२८ बनावट नोटा (५,६४,००० रुपये किमतीच्या) जप्त केल्या आहेत. तसेच नोटा छापण्यासाठी व तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा एप्सन (EPSON) कंपनीचा प्रिंटर, एचपी मॉनिटर, सीपीयु, की-बोर्ड आणि इतर साहित्य असा एकूण २१,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

आयुक्त अमितेश कुमार, अप्पर  आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


  • Labels: Vishrambaug Police, Pune Crime, Fake Currency Racket, Counterfeit Notes Seized, Pune Police

  • Search Description: Vishrambaug Police bust an inter-district fake currency racket, arresting four persons and seizing counterfeit notes worth Rs 5.64 lakh along with printing equipment.

  • Hashtags: #VishrambaugPolice #PunePolice #FakeCurrency #CrimeNews #PuneCrime #CounterfeitNotes

बनावट नोटा तयार करणारी आंतरजिल्हा टोळी अटकेत बनावट नोटा तयार करणारी आंतरजिल्हा टोळी अटकेत Reviewed by ANN news network on १०/२७/२०२६ ०५:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".