पुणे: वाहन चोरीचे ५ गुन्हे उघडकीस; खराडी पोलिसांकडून एकास अटक, पाच दुचाकी जप्त


पुणे: पुणे शहरातील विविध भागातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरास खराडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. जगजितसिंग कुलदिपसिंग काठोडे (वय ४४, रा. आदर्श नगर, लोहगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे खराडी, कोथरूड, डेक्कन आणि विमानतळ पोलीस ठाण्याकडील वाहन चोरीचे एकूण ५ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपीकडून ५ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

खराडी परिसरातुन एका नागरिकाची होंडा डिओ मोटारसायकल चोरीला गेल्याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ  निरीक्षक संजय चव्हाण यांनी तपास पथकास तपासाच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. दरम्यान, तपास पथकातील  अंमलदार मनोज खरपुडे व अशोक केदार यांना मिळालेल्या खबऱ्याच्या माहितीनुसार, लोहगाव परिसरातील आदर्श नगरमधून संशयित आरोपी जगजितसिंग काठोडे यास ताब्यात घेण्यात आले.

५ गुन्हे उघडकीस

सहायक निरीक्षक रविंद्र गोडसे, उपनिरीक्षक तेजस मगर व पथकाने आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, त्याने पुणे शहरातील विविध भागांतून ५ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. यामध्ये खराडी पोलीस ठाण्याचे २, तर कोथरूड, डेक्कन आणि विमानतळ पोलीस ठाण्या प्रत्येकी १ असे एकूण ५ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अपर आयुक्त मनोज कुमार पाटील, उपायुक्त अविनाश कुमार, सहायक आयुक्त सुनील दोगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण,  निरीक्षक (गुन्हे) चंद्रसेन पालकर, सहायक  निरीक्षक रविंद्र गोडसे, उपनिरीक्षक तेजस मगर व तपास पथकातील अंमलदारांनी ही कारवाई केली आहे.


  • Labels: Kharadi Police, Pune Crime, Vehicle Theft Busted, Stolen Bikes Recovered, Pune Police

  • Search Description: Kharadi Police arrest a serial vehicle thief, solving 5 motor-cycle theft cases registered across Kharadi, Kothrud, Deccan, and Airport police stations, and recover 5 bikes.

  • Hashtags: #KharadiPolice #PunePolice #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #StolenBikes

पुणे: वाहन चोरीचे ५ गुन्हे उघडकीस; खराडी पोलिसांकडून एकास अटक, पाच दुचाकी जप्त पुणे: वाहन चोरीचे ५ गुन्हे उघडकीस; खराडी पोलिसांकडून एकास अटक, पाच दुचाकी जप्त Reviewed by ANN news network on १०/२७/२०२६ ०५:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".