पिंपळगाव बसवंत येथे बँकेत पैसे मोजत असलेल्या महिलेची फ़सवणूक करणारा जॉन हुसेन इराणी पुणे पोलिसांच्या जाळ्यात
पुणे : बँकेत पैसे मोजत असलेल्या एका महिलेची खोटी नोट असल्याचे भासवून विश्वास संपादन करून ३३ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि नाशिक ग्रामीणमधील गुन्ह्यात पाहिजे असलेल्या सराईत आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट १ ने जेरबंद केले आहे. जॉन हुसेन परवेज इराणी (वय ४८, रा. विष्णूकृपा नगर, इराणी मस्जिद, शिवाजीनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२५ रोजी नाशिक ग्रामीणमधील पिंपळगाव बसवंत येथील बँकेतून फिर्यादी महिलेने शेतीकामासाठी १ लाख रुपये काढले होते. त्या बँकेतच पैसे मोजत असताना एका अनोळखी व्यक्तीने 'यातील एक नोट खोटी आहे' असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि ३३,००० रुपये लांबवले. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३१६(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना युनिट १ चे पोलीस हवालदार बाबा दांगडे व संतोष अनुसे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शिवाजीनगर परिसरात आला आहे. पिंपळगाव बसवंत पोलिसांशी संपर्क साधून खात्री केल्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी जॉन इराणी याला ताब्यात घेण्यात आले. त्यास पुढील कारवाईसाठी पिंपळगाव बसवंत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड, सहायक निरीक्षक धिरज राऊत आणि युनिट १ च्या पथकातील अंमलदारांनी केली आहे.
Labels: Pune Crime Branch, Nashik Rural Police, Fraud Case, Irani Gang, Pune Police
Search Description: Pune Crime Branch Unit 1 arrests a wanted accused in a bank fraud case registered at Pimpalgaon Baswant Police Station, Nashik Rural.
Hashtags: #PuneCrimeBranch #NashikPolice #FraudCase #PunePolice #CrimeNews
पिंपळगाव बसवंत येथे बँकेत पैसे मोजत असलेल्या महिलेची फ़सवणूक करणारा जॉन हुसेन इराणी पुणे पोलिसांच्या जाळ्यात
Reviewed by ANN news network
on
१०/१५/२०२६ ०४:०६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/१५/२०२६ ०४:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: