पुणे शहर गुन्हेशाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाची स्वारगेट बसस्थानक परिसरात धडक कारवाई; ३ लाख १ हजार रुपये किमतीच्या ६ किलो गांजासह दोन तस्करांना केले जेरबंद!


पुणे (दि. ३० ऑक्टोबर २०२६): पुणे शहर हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आणि तस्करी करणाऱ्या जाळयाविरोधात गुन्हे शाखेने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनच्या पथकाने स्वारगेट बस स्थानक परिसरात सापळा रचून केलेल्या धडक कारवाईत तब्बल ३ लाख १ हजार रुपये किमतीच्या ६ किलो ०२० ग्रॅम गांजासह दोन तस्करांना जेरबंद केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अफरोज पठाण आणि पथकातील अंमलदार स्वारगेट बस स्थानक परिसरात पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग दरम्यान बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये दोन संशयित इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील साहित्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली.

झडतीदरम्यान त्यांच्याकडे विक्रीसाठी आणलेला ३ लाख १ हजार रुपये किमतीचा ६ किलो ०२० ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच त्यांच्याकडून १५५ रुपयांची रोकड आणि २५ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन असा एकूण ४ लाख २६ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आशिष रमेश शिंदे (वय २१ वर्षे, रा. पी.एम.टी. कॉलणी, दत्तकृपा बिल्डींग, अप्पर, बिबवेवाडी, पुणे) आणि आशुतोष उर्फ स्वप्निल सोमनाथ कांबळे (वय २७ वर्षे, रा. सर्व्हे नंबर ६४९, साई मंदिराजवळ, शिवतेजनगर, बिबवेवाडी, पुणे) या दोघांना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७४/२०२६, एनडीपीएस ॲक्ट कलम ८ (क), २० (ब)(ii)(ब), २९ अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामागे इतर कोण मोठे रॅकेट आहे का, याचा कसून तपास सुरू आहे.

ही कारवाई अप्पर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते,उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, आणि सहायक आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे निरीक्षक जीवन माने, सहायक निरीक्षक अफरोज पठाण, अंमलदार योगेश कुंभार, संदिप देवकाते, सतीश चव्हाण, सुमित यादव, शरद धांडे, विनोद निंभोरे, प्रशांत कळसकर, रेखा साबळे, तसेच अजिंक्य जोजारे, देविदास वांढरे व दिनेश बास्टेवाड यांनी पार पाडली.

  • Labels: Pune Police, Swargate Police Station, Anti Narcotics Cell Pune, Ganja Seizure Pune, Jeevan Mane, Afroz Pathan, Pune Crime News, NDPS Act Maharashtra

  • Search Description: Read the detailed news report on Pune Crime Branch Anti-Narcotics Cell arresting two individuals with 6 kg of ganja worth Rs 3.01 lakh near Swargate bus stand.

  • Hashtags: #PunePolice #AntiNarcoticsCell #Swargate #GanjaSeizure #PuneCrime #NDPSAct #CrimeNews #MaharashtraPolice

पुणे शहर गुन्हेशाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाची स्वारगेट बसस्थानक परिसरात धडक कारवाई; ३ लाख १ हजार रुपये किमतीच्या ६ किलो गांजासह दोन तस्करांना केले जेरबंद! पुणे शहर गुन्हेशाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाची स्वारगेट बसस्थानक परिसरात धडक कारवाई; ३ लाख १ हजार रुपये किमतीच्या ६ किलो गांजासह दोन तस्करांना केले जेरबंद! Reviewed by ANN news network on १०/३१/२०२६ ०७:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".