लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल चोरीचा २४ तासांत पर्दाफाश; ७० हजारांचे चार मोबाईल जप्त व आरोपी जेरबंद
पुणे : लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांच्या आत तपास करत पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून ७० हजार रुपये किमतीचे एकूण चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. शुभम संतोष केवट (वय १९, रा. रामनगर, प्रगती हॉस्पिटलसमोर, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान अंमलदार राहुल परदेशी व सुरज ओंबासे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रामनगर येथील शुभम केवट याने चोरी केलेले मोबाईल विकण्यासाठी शादलबाबा दर्गा परिसरात गिऱ्हाईक शोधत आहे.
सहाय्यक निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे व तपास पथकाने तात्काळ शादलबाबा दर्गा आणि चामुंडामाता मंदिराच्या परिसरात सापळा रचून संशयित तरुण शुभम केवट यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील कॅरीबॅगची पाहणी केली असता त्यात चार मोबाईल फोन मिळून आले. चौकशीदरम्यान त्याने रामनगरमधील एका घराच्या टेरेसवरून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.
सदरची यशस्वी कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहाय्यक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे, निरीक्षक (गुन्हे) अमर कदम, सहाय्यक निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे आणि तपास पथकातील अंमलदारांनी केली आहे.
Labels: Laxminagar Police, Pune Crime, Mobile Theft, Recovered Mobiles, Pune Police
Search Description: Laxminagar Police arrest a mobile thief within 24 hours and recover four stolen smartphones worth Rs 70,000.
Hashtags: #LaxminagarPolice #PunePolice #MobileTheft #CrimeNews #PuneCity
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल चोरीचा २४ तासांत पर्दाफाश; ७० हजारांचे चार मोबाईल जप्त व आरोपी जेरबंद
Reviewed by ANN news network
on
१०/१५/२०२६ ०४:२०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/१५/२०२६ ०४:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: