कोंढवा-येवलेवाडी परिसरात स्पा मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका, महिला आरोपीस अटक


पुणे: पुणे शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने एका स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कोंढवा-येवलेवाडी हद्दीत बेकायदेशीर व्यवसायांचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाण्याकडून विशेष पथके तयार करण्यात आली होती. दरम्यान, तपास पथकातील उपनिरीक्षक आकाश विटे आणि त्यांचे पथक गस्त घाबत असताना, सालवे गार्डन शेजारील 'अल्टिमेट बिझनेस सेंटर' या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्पा मसाजच्या नावाखाली मुलींकडून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची गोपनीय माहिती अंमलदार गणेश चिंचकर व विजय खेंगरे यांना मिळाली.

वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ पंचांसमक्ष व बनावट ग्राहकाच्या माध्यमातून बातमीची खात्री केली. खात्री पटताच त्या फ्लॅटवर अचानक छापा टाकून वेश्यागमनासाठी उपलब्ध असलेल्या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच एका महिला आरोपीस अटक करून तिच्याविरुद्ध कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३, ३(५) आणि अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक अधिनियम (PITA) कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक कराडे करत आहेत.

सदरची कामगिरी  उपायुक्त परिमंडळ-५ च्या श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठनिरीक्षक मारुती पाटील, निरीक्षक (गुन्हे) दीपक कराडे, तपास पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक आकाश विटे आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी पार पाडली आहे.


  • Labels:Kondhwa-Yewalewadi Police raid a fake spa center, rescue two women, and arrest a female accused running a prostitution racket.

  • Search Description: Kondhwa-Yewalewadi Police raid a fake spa center, rescue two women, and arrest a female accused running a prostitution racket.

  • Hashtags: #KondhwaPolice #PunePolice #HumanTrafficking #CrimeBranch #PuneNews


कोंढवा-येवलेवाडी परिसरात स्पा मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका, महिला आरोपीस अटक कोंढवा-येवलेवाडी परिसरात स्पा मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका, महिला आरोपीस अटक Reviewed by ANN news network on १०/२१/२०२६ ०९:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".