पुणे: सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्न (IPC ३०७) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ६ वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने जेरबंद केले आहे. सुधीर बुद्धिराम विश्वकर्मा (वय ३१, रा. टेल्को कॉलनी, चव्हाणनगर, जांभूळवाडी रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे शहर आयुक्तालयातील गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष निर्देश दिले होते. त्यानुसार ६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निरीक्षक नानासाहेब कदम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व कर्मचाऱ्यांचे पथक सिंहगड रोड, वारजे माळवाडी आणि कोथरूड परिसरात गस्त घालत होते.
वडगाव चौकातून ठोकल्या बेड्या
गस्तीदरम्यान अंमलदार पांडुरंग शिंदे व तुषार किंद्रे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील गुन्हा नोंद क्रमांक १११/२०२० (भादंवि ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३४, आर्म ॲक्ट व म.पो.का.) या गुन्ह्यातील आरोपी सुधीर विश्वकर्मा हा वडगाव बुद्रुक परिसरात आला आहे. माहिती मिळताच पथकाने वडगाव चौकात जाऊन सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत तो ६ वर्षांपासून फरार असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी अप्पर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक आयुक्त शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक निरीक्षक नानासाहेब कदम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, अंमलदार पंढरीनाथ शिंदे, किशोर शिंदे, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला व आशिष राठोड यांनी केली.
Labels: Pune Crime Branch, Sinhagad Road Police Station, Absconder Arrested, Attempt To Murder, Pune Crime
Search Description: Pune Crime Branch Unit 3 arrested a criminal absconding for 6 years in an attempt to murder case under Sinhagad Road Police Station.
Hashtags: #PunePolice #CrimeBranch #SinhagadRoad #AttemptToMurder #Absconder #PuneNews
सिंहगडरोड पोलीसठाण्यातील गुन्ह्यात ६ वर्षांपासून फरारी आरोपीला अटक
Reviewed by ANN news network
on
१०/०८/२०२६ ०८:४६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/०८/२०२६ ०८:४६:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: