पुणे: मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात मागील एका वर्षापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या फरारी आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने कौशल्याने जेरबंद केले आहे. आकाश किशोर नवगीर (वय २७, रा. म्हसोबा मंदिराजवळ, गल्ली नं. ९, टिळेकरनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
५ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-२ चे अंमलदार शिंदे, मंडलिक व यादव हे हद्दीत फरारी आरोपींचा शोध घेत गस्त घालत होते. त्यावेळी अंमलदार आशिष यादव आणि कुंदन शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली की, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक १८८/२०२५ (भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३(५), म.पो.का. १३५ सह) मधील पाहिजे असलेला आरोपी आकाश नवगीर हा त्याच्या राहत्या घराच्या परिसरात आला आहे.
सापळा रचून केली अटक
सदर माहिती तात्काळ प्रभारी अधिकारी राहुल खिलारे यांना देण्यात आली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांच्या पथकाने खाजगी वाहनाने जाऊन टिळेकरनगर परिसरात सापळा रचला. घराबाहेर बसलेल्या आकाश नवगीर याला पथकाने ताब्यात घेतले. नाव व पत्त्याची खात्री केल्यानंतर त्याला गुन्ह्यात अटक करून मार्केटयार्ड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सदरची कारवाई अप्पर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक आयुक्त शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, निरीक्षक अविनाश माने, सहाय्यक उपनिरीक्षक शंकर नेवसे, अंमलदार कुंदन शिंदे, महेश मंडलिक, ओमकार कुंभार, शंकर कुंभार, योगेश मांढरे, उज्ज्वल मोकाशी, विजय पवार, संदीप शिर्के, संतोष टकले, सर्जेराव सरगर, शिवानंद कायगुडे, विद्या शिंदे व आशिष यादव यांनी केली.
Labels: Pune Crime Branch, Market Yard Police Station, Absconder Arrested, Katraj Kondhwa Road, Pune Police
Search Description: Pune Crime Branch Unit 2 arrested an absconding accused in Market Yard Police Station case after one year.
Hashtags: #PunePolice #CrimeBranch #MarketYard #AbsconderArrested #PuneNews #CrimeNews
मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात वर्षभरापासून फरारी असलेल्या आरोपीला बेड्या
Reviewed by ANN news network
on
१०/०८/२०२६ ०८:४०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/०८/२०२६ ०८:४०:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: