कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते आणि चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संचालक संदीप काटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. डॉ. सुभाषचंद्र पवार यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. कार्यक्रमादरम्यान नगरसेवक विठ्ठल काटे यांनी ‘जो तुमको हो पसंद वही बात करेंगे’ हे गाणे सादर करत उपस्थितांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी व्यासपीठावर पी के इंटरनॅशनल स्कूलचे संचालक जगन्नाथ काटे, आनंद हास्य योगा क्लबचे अध्यक्ष दिगंबर राजगुरे, लिनियर गार्डन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक वारकर तसेच असोसिएशनचे पदाधिकारी सखाराम ढाकणे, सुभाष पाटील, शकुंतला शिंदे आणि अनिल कुलकर्णी उपस्थित होते.
सांस्कृतिक सत्राची सुरुवात भामिनी महाले यांच्या कोजागिरीविषयक कवितेने झाली. त्यानंतर रवींद्र संधानशिवे, अशोक येळंमकर, रेखा येळंमकर, अनिल कुलकर्णी, माधुरी मुलमुले, सुभाष विधाते, शशांक लोकरस, जयपाल सिदनाळे, रमेश चांडगे, अविनाश ईजारदार आणि सुरेखा पाटील यांनी लोकप्रिय गाणी सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. ज्येष्ठ रंगकर्मी उमेश धूत यांनी ‘नटसम्राट’ नाटकातील स्वगत सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकुंतला शिंदे यांनी केले, तर सखाराम ढाकणे यांनी आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनीलकुमार शाह, रमेश वाणी, दिलीप चौगुले, अशोक कलाल, निर्मला कासार, शोभा राजगुरे, पद्मा गवळी आणि विमल मोंढेकर यांनी परिश्रम घेतले.
---
- **Labels:** Pimple Saudagar, Kojagiri Purnima, Senior Citizens, PCMC News, Cultural Events, Pune News, Community Celebration, Maharashtra News
- **Search Description:** Senior citizens in Pimple Saudagar celebrated Kojagiri Purnima with musical performances, poetry, and drama at Balasaheb Kunjir Ground.
- **Hashtags:** #PimpleSaudagar #KojagiriPurnima #SeniorCitizens #PCMC #PuneNews #CulturalEvent #MarathiNews #Maharashtra
Reviewed by ANN news network
on
१०/३१/२०२६ ०६:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: