मुंबई: अंमली पदार्थांसारखा वापर केल्या जाणाऱ्या 'कोडिन फॉस्फेट' मिश्रित कफ सिरपच्या बाटल्यांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या फरार आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाला (एएनसी) यश आले आहे. आझाद मैदान युनिटने ही कारवाई मस्जिद बंदर येथील इस्राईल मोहल्ला परिसरात केली असून आरोपीच्या ताब्यातून ३ लाख ६७ हजार रुपये किमतीच्या ३६७ कफ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, १७ जुलै २०२६ रोजी आझाद मैदान युनिटच्या पथकाने पायधुनी परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले होते. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 'कोडिन फॉस्फेट मिश्रित' कफ सिरपच्या १५७ बाटल्या आढळल्या होत्या. या प्रकरणी आझाद मैदान युनिटमध्ये (गु.र.क्र. ६७/२०२६) एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २१(क) अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती.
अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीत तो पायधुनी व लगतच्या परिसरात गेल्या काही काळापासून कोडिन कफ सिरपची तस्करी करत असल्याचे निष्पन्न झाले. या बेकायदेशीर साखळीचा मूळ पुरवठादार आणि निर्माता कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक व सखोल तपास सुरू केला.
तपासादरम्यान ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २२:५० वाजेच्या सुमारास गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीचा पायधुनी येथील मस्जिद बंदर रोडवर, मोची चाळ परिसरात वावर असल्याची पक्की माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील जागेची झडती घेतली असता ३६७ कोडिन कफ सिरपच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, उपआयुक्त पूर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान युनिटचे प्रभारी निरीक्षक शैलेश सूर्यवंशी, सहायक निरीक्षक प्रमोद आवळे, उपनिरीक्षक राम लिंगे, हवालदार पाटील, चव्हाण, प्रभु, ढोरे, करांडे आणि शिपाई गोसावी, शिंदे, सिंह, कांबळे यांनी पार पाडली.
Labels: Mumbai Crime, Drug Bust, ANC Azad Maidan, Codeine Syrup Seizure, Mumbai Police, NDPS Act
Search Description: Mumbai Police ANC Azad Maidan unit arrested a wanted drug peddler and seized 367 bottles of Codeine Phosphate cough syrup in Masjid Bunder.
Hashtags: #MumbaiPolice #ANC #CodeineSeized #MasjidBunder #CrimeNews #MumbaiCrime #DrugFreeMumbai
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा