वाहनचोरीप्रकरणी अल्पवयीन ताब्यात; लातूरमधील खरेदीदाराला अटक करून १४ गाड्या जप्त


पुणे: विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाहनचोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आणि लातूर येथील गाड्या खरेदी करणाऱ्या आरोपीकडून १० लाख रुपये किमतीच्या एकूण १४ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि इतर जिल्ह्यांतील १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.

२३ जून २०२६ रोजी नवीन पेठ येथील टिळक हॉटेलजवळून एक होंडा शाईन गाडी चोरीला गेली होती. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक उमेश कारके या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान संशयित मुले नारायण पेठेत थांबल्याची पक्की बातमी अंमलदारांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकला असता, एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळाला, तर दुसऱ्या विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पालकांसमक्ष चौकशी केली असता, त्याने आपल्या फरार साथीदाराच्या मदतीने पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातून अनेक गाड्या चोरल्याची कबुली दिली. तसेच यातील गाड्या लातूर येथील कृष्णा चंद्रकांत शेळके (वय २६, रा. अहमदपूर, लातूर) याला विकल्याचे सांगितले. पोलीस पथकाने तात्काळ लातूर गाठून कृष्णा शेळके याला ताब्यात घेतले व अटक केली.

या कारवाईत विश्रामबाग ठाण्यातील २, समर्थ १, हडपसर १, भारती विद्यापीठ १, विमानतळ १, काळेवाडी (पिंपरी चिंचवड) १ असे ७ आणि इतर जिल्ह्यांतील ५ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. १० लाखांच्या १४ गाड्या जप्त करण्यात आल्या असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपआयुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप, निरीक्षक विकास भिंगारदिवे, रमेश लाहिगुडे, सहाय्यक निरीक्षक उमेश कारके आणि पथकाने केली.

  • Labels: Vishrambaug Police Station, Bike Theft Racket, Pune Crime, Vehicle Recovery, Latur Connection

  • Search Description: Vishrambaug Police recovered 14 stolen motorcycles worth Rs 10 lakh, detaining a juvenile and arresting a buyer from Latur.

  • Hashtags: #PunePolice #VehicleTheft #BikeThief #VishrambaugPolice #CrimeNews

वाहनचोरीप्रकरणी अल्पवयीन ताब्यात; लातूरमधील खरेदीदाराला अटक करून १४ गाड्या जप्त वाहनचोरीप्रकरणी अल्पवयीन ताब्यात; लातूरमधील खरेदीदाराला अटक करून १४ गाड्या जप्त Reviewed by ANN news network on ९/१५/२०२६ ०६:०६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".