पुणे (विशेष बातमीदार): पुणे शहरातील ऐतिहासिक गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचा गैरफायदा घेऊन गणेशभक्तांचे मोबाईल फोन लांबवणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरजिल्हा सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. २६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास भिडे पुलाजवळील नदीपात्रात छापा टाकून पोलिसांनी तब्बल ११ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपींकडून ६३ विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन, एक शेवरलेट क्रुझ कार, सुऱ्या, कटर आणि लाल मिरची पावडर असा एकूण ३० लाख ५७ हजार ५० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, झाशीची राणी चौक, पुणे महानगरपालिका परिसर आणि लक्ष्मी रस्ता येथे २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:०० ते पहाटे ६:३० च्या दरम्यान लाखो भाविक गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आले होते. या प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन भक्तांच्या खिशातील मोबाईल फोन चोरी करणाऱ्या टोळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निगराणी पथक परिसरात गस्त घालत होते.
गुप्त बातमी आणि पहाटेची कारवाई
गस्तीवर असताना निगराणी पथकाचे उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना गोपनीय बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की, भिडे पुलाजवळ नदीपात्रात सात ते आठ इसम हत्यारानिशी दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले आहेत. या बातमीची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि उपनिरीक्षक मनिषा वलसे यांना कडक सूचना देऊन कारवाईचे नियोजन केले.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पहाटे ५:१५ वाजेच्या सुमारास भिडे पुलाजवळील नदीपात्रात सापळा रचला. पहाटे ६:५० वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या आणि चोरीचे मोबाईल जमा करण्याच्या तयारीत असलेल्या ११ जणांना पोलिसांनी चारी बाजूंनी वेढा घालून जागीच ताब्यात घेतले.
मालेगाव व वाशीमच्या आरोपींचा समावेश
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बहुतांश जण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि वाशीम भागातील रहिवासी आहेत. अटक आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १) अब्दुल कादीर नुर मोहम्मद (वय २८ वर्षे, रा. गुलशेर नगर, गल्ली क्र. ७, मालेगाव, नाशिक) २) अब्दुल मालिक अब्दुल खालीक (वय २२ वर्षे, रा. गुलशेर नगर, गल्ली क्र. १४, मालेगाव, नाशिक) ३) जियाऊ रहेमान शौकत हुसेन (वय २६ वर्षे, रा. हिरापुरा, मालेगाव, नाशिक) ४) मोहम्मद अस्वद मोहम्मद अजमल (वय ३१ वर्षे, रा. सालेम मुनशी नगर, मालेगाव, नाशिक) ५) फैसल अजीज खान (वय २४ वर्षे, रा. हिरापुरा, मालेगाव, नाशिक) ६) हुजेफा अंजुम मोहम्मद साजीद (वय ३० वर्षे, रा. रविवार वार्ड, मालेगाव, नाशिक) ७) जुबेर अहमद मुख्तार अहमद (वय ३५ वर्षे, रा. गुलशेर नगर, मालेगाव, नाशिक) ८) अझर अहेमद अल्लाफ अहेमद मोमीन (वय ३० वर्षे, रा. गुलशेर नगर, मालेगाव, नाशिक) ९) नावेद अख्तार शफीक अहमद अन्सारी (वय ३३ वर्षे, रा. गिरणारोड, हिरापुरा, मालेगाव, नाशिक) १०) अतहर अहमद एजाज अहमद (वय २३ वर्षे, रा. मुस्लीम नगर बी, मालेगाव, नाशिक) ११) अतुल मारोती इंगळे (वय २४ वर्षे, रा. मु.पो. गिरोली, मनोरा, जि. वाशीम)
पकडण्यात आलेल्या या टोळीकडून ६३ वेग-वेगळ्या कंपन्यांचे अँड्रॉइड व महागडे मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली शेवरलेट क्रुझ कार, दोन तीक्ष्ण सुऱ्या, कटर आणि लाल तिखट मिरची पावडर असा ३०,५७,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१० (४), ३१० (२), ३०९ (४) सह आर्म्स ॲक्ट कलम ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह आयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त (परिमंडळ १) ऋषिकेश रावले आणि साहाय्यक आयुक्त (विश्रामबाग विभाग) अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मनिषा वलसे, साहाय्यक फौजदार प्रदीप खळदकर, तसेच अंमलदार गणेश चोबे, तेजस चोपडे, बिडे, वालकोळी, गणेश जाधवर, सावके, वाघ, बेडवाल, भोसले, चोपडे व येसणपुरे यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.
Labels:
Pune Crime News,Shivajinagar Police Station,Ganeshotsav Mobile Theft,Pune Police Arrest,Malegaon Gang Arrest PuneSearch Description:
Shivajinagar police arrested 11 members of a gang from Malegaon and Washim during Pune Ganpati Visarjan procession, recovering 63 stolen mobile phones and weapons.Hashtags:
#PunePolice #ShivajinagarPolice #PuneCrime #Ganeshotsav2026 #MobileThiefGang #MaharashtraPolice #CrimeNews
गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या मालेगाव आणि वाशीमच्या टोळीला अटक
Reviewed by ANN news network
on
९/२९/२०२६ ०४:२६:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: