पुणे शहरात गणेशोत्सव देखावे व विसर्जन मिरवणुकीसाठी वाहनांच्या पार्किंगची २६ ठिकाणी सोय


पुणे (दि. २२ सप्टेंबर २०२६): पुणे शहरातील गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आणि २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुख्य विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक विभागाने शहरभरात २६ प्रमुख ठिकाणी वाहन पार्किंगची विशेष सोय केली आहे. पुणे शहरात १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून शहरातील मध्यवर्ती भागात देखावे, रोषणाई आणि मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजेपासून मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे. मिरवणुकीसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांची वाहने अस्ताव्यस्त उभी राहून वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महापालिका, खाजगी संस्था, शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक मोकळ्या जागांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रमुख २५ ते २६ पार्किंगची ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत:

१. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग (दुचाकी)
२. शिवाजी आखाडा वाहनतळ (दुचाकी / चारचाकी)
३. देसाई कॉलेज (पोलीस पार्किंग)
४. हमालवाडा, पत्र्या मारुती चौकाजवळ (दुचाकी / चारचाकी)
५. गोगटे प्रशाला (दुचाकी)
६. AISSMS मैदान, आरटीओ चौक (दुचाकी / चारचाकी)
७. एस. पी. कॉलेज मैदान (दुचाकी / चारचाकी)
८. पीएमपीएमएल मैदान, पुरम चौकाजवळ (चारचाकी)
९. पेशवे पार्क, सारसबाग (दुचाकी)
१०. हरजीवन हॉस्पिटल समोर, सावरकर चौक (दुचाकी)
११. पाटील प्लाझा पार्किंग (दुचाकी)
१२. पर्वती ते दांडेकर पूल (दुचाकी)
१३. दांडेकर पूल ते गणेशमळा (दुचाकी)
१४. गणेशमळा ते राजाराम पूल (दुचाकी)
१५. निलायम टॉकीज परिसर (दुचाकी / चारचाकी)
१६. BMCC कॉलेज मैदान (दुचाकी / चारचाकी)
१७. आबासाहेब गरवारे कॉलेज (दुचाकी / चारचाकी)
१८. संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान (दुचाकी / चारचाकी)
१९. फर्ग्युसन कॉलेज मैदान (दुचाकी / चारचाकी)
२०. जैन हॉस्टेल, बीएमसीसी रोड मैदान (दुचाकी / चारचाकी)
२१. मराठवाडा कॉलेज (दुचाकी)
२२. पेशवे पथ (दुचाकी)
२३. रानडे पथ (दुचाकी / चारचाकी)
२४. काँग्रेस हाऊस रोड (दुचाकी)
२५. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड (दुचाकी / चारचाकी)
२६. नदीपात्र (भिडे पूल ते गाडगीळ पूल - दुचाकी व चारचाकी)

वाहतूक पोलिसांनी सर्व नागरिक आणि भाविकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपली वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्क न करता नियुक्त केलेल्या पार्किंग स्थळांवरच लावावीत आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.


  • Labels: Pune Traffic, Ganeshotsav 2026, Parking Rules, Pune Traffic Police, Pune News, Traffic Diversions

  • Search Description: Pune Traffic Police designated 26 official parking spots across the city for Ganeshotsav 2026 and Ganesh Visarjan procession.

  • Hashtags: #PuneTraffic #Ganeshotsav2026 #PuneParking #Visarjan2026 #PunePolice #GaneshFestival

पुणे शहरात गणेशोत्सव देखावे व विसर्जन मिरवणुकीसाठी वाहनांच्या पार्किंगची २६ ठिकाणी सोय पुणे शहरात गणेशोत्सव देखावे व विसर्जन मिरवणुकीसाठी वाहनांच्या पार्किंगची २६ ठिकाणी सोय Reviewed by ANN news network on ९/२३/२०२६ ०५:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".