पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या परिमंडळ-७ च्या वतीने शहरात सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' या विशेष मोहिमेअंतर्गत बेकायदेशीर शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे
स्मशानभूमीजवळ सापळा रचून कारवाई:
पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार आणि परिमंडळ-७ चे पोलीस उपायुक्त अबिनाष कुमार यांच्या नेतृत्वाखाली झोन-७ च्या विशेष पथकाने ही धडक कामगिरी केली
२ गावठी पिस्तुले आणि काडतुसे हस्तगत:
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे प्रत्येकी १ गावठी पिस्तूल आणि १ जिवंत काडतूस असे एकूण २ गावठी पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे मिळून आली
सदर कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस हवालदार सुशिल बेंद्रे, विलास केदारी, गणेश इथापे, पोलीस शिपाई हरीप्रसाद पुंडे, शुभम चिनके, अमोल सरतापे व लालू कहे यांच्या पथकाने पार पाडली
'मिशन क्रॅकडाऊन' सुरूच राहणार; पोलिसांचे आवाहन:
पुणे शहरातील परिमंडळ-७ अंतर्गत प्रतिबंधित गुटखा, अमली पदार्थ, अवैध दारू, जुगार तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध 'मिशन क्रॅकडाऊन' अधिक तीव्रतेने राबवले जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त अबिनाष कुमार यांनी स्पष्ट केले आहे
Labels: Pune Police, Chandannagar Police, Illegal Weapons Seized, Mission Crackdown, Wadgaonsheri News, Crime Branch Pune, Pistol Seized Pune
Search Description: Under 'Mission Crackdown', Pune Police Zone 7 seized 2 country-made pistols and 2 live rounds near Wadgaonsheri, arresting two suspects.
Hashtags: #PunePolice #MissionCrackdown #ChandannagarPolice #PistolSeized #PuneCrime News #Wadgaonsheri #LawAndOrder
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: