पुणे : मागील सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गांजा तस्करीतील आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. अजय पोपटपाव पाडुळे (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पुणे शहरातील गांजा विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित चार गुन्हे दाखल असून, त्यातील एका गुन्ह्यात ३५ किलो ७६ ग्रॅम गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे नमूद आहे. तपासात अजय पाडुळे हा पुणे शहरातील गांजा विक्री व्यवसायाचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले.
अजय पाडुळे हा पोलिसांची नजर चुकवून महाराष्ट्रातून पसार झाला होता. तो आई आणि बहिणीला भेटण्यासाठी पुरंदर चौक, नवी म्हाडा कॉलनी, हडपसर येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ५ सप्टेंबर २०२६ रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, लोणी काळभोर आणि वानवडी ठाण्यांत गांजा विक्रीसंबंधी चार गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी उपआयुक्त (परिमंडळ) मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड, निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव यांच्या सूचनेनुसार पार पडली. तपास पथकात उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अंमलदार किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले आणि निलेश खैरमोडे यांनी भाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मोकाशी करत आहेत.
Labels:
Pune Crime, Pune Police, Bharati Vidyapeeth Police, Ganja Smuggling, Ganja Trafficking, Hadapsar Crime, NDPS Act, Pune Crime News, Drug Trafficking, Maharashtra Crime
Search Description:
The investigation team of Bharti Vidyapeeth Thana arrested the accused who had been absconding for six months in ganja smuggling from Hadapsar. Four cases have been registered against the accused.
Hashtags:
#PuneCrime #PunePolice #BharatiVidyapeeth #GanjaSmuggling #GanjaTrafficking #Hadapsar #NDPSAct #PuneNews #CrimeNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: