पुणे : मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चोरीच्या मोबाईल विक्रीप्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २ लाख २७ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल फोन जप्त केले. या कारवाईत प्रणित नरेंद्र जाधव (वय २०, रा. दर्ग्याच्या पाठीमागे, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) आणि राहुल सुरेश सहाणी (वय २२, रा. ठिटे वस्ती, चौधरी गोठ्याजवळ, खराडी, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान आरोपींकडून चोरी केलेले एकूण १४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत २,२७,००० रुपये असल्याचे नमूद आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, उपआयुक्त, परिमंडळ ६ जीवन बेनिवाल आणि सहायक आयुक्त, हडपसर विभाग अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता वासनिक आणि निरीक्षक (गुन्हे) सागर गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली. पथकात सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, संभाजी नाईक, अंमलदार विनोद साळुंके, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, शिवाजी धांडे, चेतन गायकवाड, राहुल मोरे, सचिन बोराटे, रुपेश तोडकर, सलीम अत्तार, योगेश राऊत, स्वप्निल रासकर आणि अक्षय धुमाळ यांनी सहभाग घेतला. पुढील तपास अंमलदार विनोद साळुंके करीत आहेत.
Labels: Pune Crime, Mundhwa Police, Mobile Theft, Mobile Theft Case, Stolen Mobile Phones, Pune Crime News, Mundhwa Crime, Theft Case, Pune Police, Maharashtra Crime
Search Description: Mundhwa Police arrested two accused in a mobile theft case and recovered 14 stolen mobile phones worth Rs. 2.27 lakh in Pune.
Hashtags: #PuneCrime #MundhwaPolice #MobileTheft #StolenMobilePhones #PuneNews #CrimeNews #Mundhwa #PunePolice #MaharashtraCrime
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: