पोक्सो गुन्ह्यातील दोन महिन्यांपासून फरार आरोपीला कॅम्प परिसरातून अटक; पुणे गुन्हे शाखा युनिट-१ ची धडक कारवाई


पुणे : शरिराविरुद्धचे गंभीर गुन्हे आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात मागील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने कॅम्प परिसरातील साहिल हॉटेलसमोरून शिताफीने अटक केली. अबालू जाफर इराणी (वय ५०, रा. कांबळे पथ, विष्णू कृपा नगर, रेल्वे स्टेशन जवळ, इराणी वस्ती, शिवाजीनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दोन महिन्यांपूर्वी खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटील इस्टेट (गल्ली क्र. ८, शिवाजीनगर) येथे आरोपी अबालू जाफर इराणी याने फिर्यादीचे केस ओढून त्यांना पोटात, कमरेवर व छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच फिर्यादीचे कपडे फाडून त्यांच्या आईला गंभीर धमकी दिली होती. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात दाखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता; मात्र घटना घडल्यापासून आरोपी सतत पोलिसांना चकवा देत फरार होता.

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक हद्दीत फरार व तडीपार आरोपींचा शोध घेत असताना अंमलदार बाबासाहेब दांगडे यांना गुप्त बातमीदाराकडून पक्की बातमी मिळाली. आरोपी अबालू इराणी हा कॅम्प परिसरातील साहिल हॉटेलसमोर निळ्या रंगाचा हाफ बाह्यांचा आणि आडवे पट्टे असलेला टी-शर्ट घालून थांबल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी खडकी पोलिसांशी संपर्क साधून गुन्ह्याची खात्री केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने साहिल हॉटेल परिसरात तात्काळ धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकाने त्याला चौफेर घेरून जागेवरच ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपीवर कायदेशीर कारवाई करून पुढील तपासासाठी त्यास खडकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर यशस्वी कारवाई सहाय्यक आयुक्त शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड, सहाय्यक निरीक्षक धीरज राऊत, अंमलदार बाबासाहेब दांगडे, प्रमोद जगताप, संतोष नागरे, संतोष अनुसे, आशिष शेलार आणि दळवी यांच्या पथकाने केली.


  • Labels: Pune Police, Crime Branch, POCSO Arrest, Pune Crime News, Absconding Accused Arrested, Khadki Police

  • Search Description: Pune Police Crime Branch Unit 1 arrested absconding POCSO accused Abalu Jafar Irani from Camp area Pune.

  • Hashtags: #PunePolice #CrimeBranch #POCSOArrest #PuneNews #CrimeNews #KhadkiPolice

पोक्सो गुन्ह्यातील दोन महिन्यांपासून फरार आरोपीला कॅम्प परिसरातून अटक; पुणे गुन्हे शाखा युनिट-१ ची धडक कारवाई पोक्सो गुन्ह्यातील दोन महिन्यांपासून फरार आरोपीला कॅम्प परिसरातून अटक; पुणे गुन्हे शाखा युनिट-१ ची धडक कारवाई Reviewed by ANN news network on ९/२४/२०२६ ०५:०८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".