मुंढव्यातून चोरीला गेलेल्या दोन रिक्षा जप्त; आरोपीला भेकराईनगरमधून ठोकल्या बेड्या


पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कौशल्याने तपास करत चोरीला गेलेल्या १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन रिक्षा जप्त केल्या आहेत. या प्रकरणात सतीश तानाजी देवारे (वय ४०, रा. शिक्षक कॉलनी, भेकराईनगर, हडपसर, पुणे) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मुंढवा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर २९९/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५)) च्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयित सतीश देवारे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून मुंढवा हद्दीतून चोरी झालेली रिक्षा (क्र. MH12/SK/3778) जप्त करण्यात आली.

अधिक चौकशीत आरोपीने स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही एक रिक्षा चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार स्वारगेट येथील गुन्ह्यातील रिक्षा (क्र. MH-12/QR/9856) देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. जप्त करण्यात आलेल्या या दोन्ही ऑटो रिक्षांची एकूण किंमत १ लाख ३० हजार रुपये आहे.

ही कामगिरी पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ६) जीवन बेनिवाल आणि सहाय्यक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या अधिपत्याखाली वरिष्ठ निरीक्षक स्मिता वासनिक, निरीक्षक (गुन्हे) सागर गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, अंमलदार शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, चेतन गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, किरण बनसोडे, सलीम अत्तार, योगेश राऊत, स्वप्निल रासकर आणि अक्षय धुमाळ यांनी ही कारवाई केली.

  • Labels: Mundhwa Police Station, Autorickshaw Theft, Pune Crime, Satish Devare Arrested, Pune Police

  • Search Description: Mundhwa Police arrested Satish Devare and recovered two stolen autorickshaws worth Rs 1.30 lakh from Mundhwa and Swargate areas.

  • Hashtags: #MundhwaPolice #AutoTheft #PuneNews #CrimeUpdate #PunePolice

मुंढव्यातून चोरीला गेलेल्या दोन रिक्षा जप्त; आरोपीला भेकराईनगरमधून ठोकल्या बेड्या मुंढव्यातून चोरीला गेलेल्या दोन रिक्षा जप्त; आरोपीला भेकराईनगरमधून ठोकल्या बेड्या Reviewed by ANN news network on ९/१५/२०२६ ०६:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".