शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

मेफेड्रॉन (एम.डी.) प्रकरणात दोन आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी व १ लाख दंड


मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-१० च्या पथकाने अमली पदार्थ तस्करांविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत जप्त केलेल्या ४३ लाख रुपयांच्या मेफेड्रॉन (एम.डी.) प्रकरणात मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने दोन आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

२८ मार्च २०२४ रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे कक्ष-१० च्या पथकाने ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकला होता. या छाप्यात आरोपी आकाश अनिल सिंग (वय २६) याच्या ताब्यातून ११ लाख रुपये किमतीचा ५५ ग्रॅम एम.डी. आणि आरोपी भवन हयात सिंग अधिकारी (वय ४०) याच्या ताब्यातून ३२ लाख रुपये किमतीचा १०५ ग्रॅम एम.डी. असा एकूण १६० ग्रॅमचा बेकायदेशीर साठा हस्तगत करण्यात आला होता. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मनोज सुतार व त्यांच्या पथकाने तांत्रिक पुरावे व साक्षीदारांचे जबाब संकलित करून विशेष सत्र न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाने मांडलेला सबळ युक्तिवाद आणि कोर्ट पैरवी अधिकाऱ्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दोन्ही आरोपींना दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Labels: Crime News, Mumbai Police, Crime Branch, NDPS Act, Mumbai Court, Drug Seizure, Oshiwara News

Search Description: 160 grams MD in Mumbai. The Special Sessions Court sentenced the two accused to 10 years hard labor and a fine of Rs 1 lakh each.

Hashtags: #MumbaiPolice #CrimeBranch #NDPS #CourtVerdict #OshiwaraPolice #DrugSeizure #MumbaiNews



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा