वाहतूककोंडी, पाणीटंचाई व नागरीसमस्यांवर तत्काळ उपाययोजना करा: खासदार श्रीरंग बारणे यांचे पालिका प्रशासनाला निर्देश

 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरा व असमान पाणीपुरवठा, बीआरटी मार्गांची झालेली दुरवस्था, पवना नदीचे वाढते प्रदूषण आणि अनधिकृत बांधकामांमुळे रखडलेले रस्ते यांसारख्या गंभीर नागरी समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

खासदार बारणे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत पालिका मुख्यालयात एक विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीस शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसेवक निलेश तरस, ऐश्वर्या तरस, राजेंद्र तरस, बापू कातळे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, पाणीपुरवठा सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी व इतर विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील प्रमुख समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रमुख सूचना व निर्देश खालीलप्रमाणे आहेत:

  • वाहतूक नियोजन व पार्किंग: अतिक्रमणे, अनधिकृत विक्रेते आणि बेशिस्त पार्किंगमुळे चौकाचौकांत होणाऱ्या कोंडीवर मात करण्यासाठी पोलीस आयुक्तांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन सूक्ष्म नियोजन करावे. संध्याकाळच्या वेळी शहरात येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेससाठी शहराबाहेर स्वतंत्र पार्किंग व्यवस्था निर्माण करावी.

  • स्मार्ट सिटी सीसीटीव्ही ऑडिट: शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी किती चालू आहेत याचा ठोस हिशोब प्रशासनाकडे नाही. त्यामुळे या कामाचे सखोल 'थर्ड पार्टी ऑडिट' करून सर्व कॅमेरे २४ तास कार्यरत ठेवावेत.

  • पाणीपुरवठा व पवना नदी प्रदूषण: नागरिकांना शुद्ध आणि समान दाबाने पाणी मिळालेच पाहिजे. पाणी वाटपाचे निश्चित वेळापत्रक पाळावे. पवना नदीत रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्यांवर प्रभागाधिकाऱ्यांमार्फत थेट गुन्हे दाखल करून पुढील दोन महिन्यांत कठोर कारवाई करावी.

  • बीआरटी व खड्डे मुक्ती: बीआरटी लेनमधील कचरा, उगवलेले गवत आणि तुटलेले बॅरिकेट्स हटवून स्वच्छता करावी. पावसाळ्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत व रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी फिरती पथके तैनात करावीत.

  • अ‍ॅमेनिटी स्पेस व विकासकामे: महापालिकेच्या ताब्यातील अ‍ॅमेनिटी स्पेसच्या जागांचा गैरवापर रोखण्यासाठी अशा सर्व भूखंडांची यादी जाहीर करावी. तिथे सीमाभिंती बांधून खेळाची मैदाने विकसित करावीत. तसेच कासारवाडी-फुगेवाडी अंडरपासचे काम, डीपी रस्ते तातडीने ताब्यात घेणे आणि रावेत, किवळे, पुनवळे या नवीन भागांतील रस्ते, पाणी व विजेचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत.


Labels: Pimpri Chinchwad News, Srirang Barne, PCMC, Traffic Congestion, Water Supply, Smart City Pune, Pavana River Pollution, Civics News

Search Description: Commissioner Dr. Srirang Barne directed to take immediate measures on the traffic congestion, water shortage, bad condition of BRT and Pavana river pollution in Pimpri-Chinchwad. Given in the meeting of Vijay Suryavanshi.

Hashtags: #PimpriChinchwad #PCMC #SrirangBarne #PCM CNews #TrafficProblem #WaterScarcity #SmartCity #PavanaRiver #PimpriNews



वाहतूककोंडी, पाणीटंचाई व नागरीसमस्यांवर तत्काळ उपाययोजना करा: खासदार श्रीरंग बारणे यांचे पालिका प्रशासनाला निर्देश वाहतूककोंडी, पाणीटंचाई व नागरीसमस्यांवर तत्काळ उपाययोजना करा: खासदार श्रीरंग बारणे यांचे पालिका प्रशासनाला निर्देश Reviewed by ANN news network on ९/०३/२०२६ ०६:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".