पुणे, ३ सप्टेंबर : ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या भ्याड कृत्याचा लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) च्या एससी एसटी आघाडीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
या संदर्भात आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय आल्हाट यांच्यासह पदाधिकारी प्रमोद राजगुरू, दत्तात्रय राजगुरू, विजय आटवल, विजय कदम आणि के. सी. पवार यांनी संयुक्त पत्रक जारी करून या घटनेचा निषेध नोंदवला.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष संजय आल्हाट म्हणाले, "लोकशाही व्यवस्थेत विचारांना उत्तर विचारांनीच दिले पाहिजे, गुंडगिरीने नाही. पुण्यासारख्या सांस्कृतिक आणि पुरोगामी शहरात अशा प्रकारच्या हिंसक घटना घडणे हे अत्यंत निषेधार्ह आणि चिंताजनक आहे."
ध्वनिप्रदूषणासारख्या सामाजिक प्रश्नावर लढा देणाऱ्या कार्यकर्त्यावर असा प्रयत्न होणे म्हणजे सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अविलंब अटक करावी, तसेच विद्यानंद बापट यांच्या जीवाला धोका लक्षात घेता त्यांना योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी आग्रही मागणी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेचा 'जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघ' यांच्या वतीनेही जाहीर निषेध करण्यात आला आहे.
Labels: Maharashtra News, Pune News, Crime News, Vidyanand Bapat, Lok Janshakti Party, LJP SC ST Cell, Sanjay Alhat, Pune Police
Search Description:Lok Janshakti Party SC ST Aghadi strongly protested the attempt to beat social activist Vidyanand Bapat who was fighting against noise pollution in Pune. Demand action against the accused and protection to Bapat.
Hashtags: #PuneNews #VidyanandBapat #LokJanshaktiParty #MaharashtraNews #CrimeNews #PunePolice #Protest #LJP
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: