पुणे: पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई केली आहे
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व त्यांचे पथक स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते
बातमी मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चित्रागंधा अपार्टमेंट परिसरात सापळा रचला
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी १,६०,५६० रुपये किमतीचा ५३.५२ मिलीग्राम मेफेड्रॉन (एमडी) हा घातक अंमली पदार्थ जप्त केला
याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३०१/२०२६ एनडीपीएस ॲक्ट कलम ८(क), २२(क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त हसन गौहर, सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे,उपनिरीक्षक योगेश कोतकर, अंमलदार विठ्ठल साळुंखे, राहुल मद्देल, अमोल सरडे, किरण जाधव, अमरनाथ लोणकर, निलेश जाधव, अतुल क्षीरसागर, तुषार साळुंखे, संजय राजे, भिलारे, अविनाश रेडके, मंगेश गुंड, अक्षय शिर्के व आशा भिंगारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली
Labels: Mephedrone Seizure, Pune Drug Raid, Swargate Police Station, Anti Narcotics Cell Pune, Gultekdi MD Seizure, Pune Crime News
Search Description: Anti Narcotics Cell Pune seizes Mephedrone (MD) worth Rs 1.6 lakh in Gultekdi, arrests 19-year-old Yash Arane and detains 2 juveniles.
Hashtags: #PunePolice #DrugFreePune #AntiNarcoticsCell #Swargate #Mephedrone #PuneNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा