पुण्यात १.६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त; १ जण अटकेत तर २ अल्पवयीन ताब्यात


पुणे: पुणे  गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई केली आहे. चित्रागंधा अपार्टमेंट, गुलटेकडी येथे सापळा रचून १ लाख ६० हजार ५६० रुपये किमतीचे ५३.५२ मिलीग्राम मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात एका १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व त्यांचे पथक स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्तीदरम्यान, चित्रागंधा अपार्टमेंटच्या दक्षिणेकडील गेटसमोरील सार्वजनिक रस्त्यावर (गुलटेकडी, पुणे) तीन जण मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची अत्यंत गुप्त बातमी पथकाला मिळाली.

बातमी मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चित्रागंधा अपार्टमेंट परिसरात सापळा रचला. संशयित येताच पोलिसांनी छापा टाकून यश राजू आरणे (वय १९ वर्षे, रा. गल्ली क्र. १, मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी, पुणे) याला एका विधीसंघर्षित बालकासह जागीच ताब्यात घेतले. मात्र, या कारवाई दरम्यान एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी १,६०,५६० रुपये किमतीचा ५३.५२ मिलीग्राम मेफेड्रॉन (एमडी) हा घातक अंमली पदार्थ जप्त केला. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली ५०,००० रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा स्कूटर आणि १०,००० रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण २,२०,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३०१/२०२६ एनडीपीएस ॲक्ट कलम ८(क), २२(क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून पळून गेलेल्या दुसऱ्या विधीसंघर्षित बालकालाही शोधून ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते,  उपायुक्त हसन गौहर, सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे,उपनिरीक्षक योगेश कोतकर, अंमलदार विठ्ठल साळुंखे, राहुल मद्देल, अमोल सरडे, किरण जाधव, अमरनाथ लोणकर, निलेश जाधव, अतुल क्षीरसागर, तुषार साळुंखे, संजय राजे, भिलारे, अविनाश रेडके, मंगेश गुंड, अक्षय शिर्के व आशा भिंगारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


  • Labels: Mephedrone Seizure, Pune Drug Raid, Swargate Police Station, Anti Narcotics Cell Pune, Gultekdi MD Seizure, Pune Crime News

  • Search Description: Anti Narcotics Cell Pune seizes Mephedrone (MD) worth Rs 1.6 lakh in Gultekdi, arrests 19-year-old Yash Arane and detains 2 juveniles.

  • Hashtags: #PunePolice #DrugFreePune #AntiNarcoticsCell #Swargate #Mephedrone #PuneNews


पुण्यात १.६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त; १ जण अटकेत तर २ अल्पवयीन ताब्यात पुण्यात १.६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त; १ जण अटकेत तर २ अल्पवयीन ताब्यात Reviewed by ANN news network on ९/११/२०२६ ०४:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".