आंबेगाव बुद्रुक येथील गोळीबार प्रकरणातील ५ सराईत गुन्हेगार जेरबंद

 


३ पिस्तूले अन् ४ काडतुसे जप्त

पुणे: आंबेगाव बुद्रुक येथील हरणाई कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये जुन्या वादातून तरुणावर अंधाधुंद गोळीबार करून पसार झालेल्या ५ सराईत गुन्हेगारांना आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. आरोपींकडून ३ गावठी पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

५ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १:३० वाजता भेंडी चौक, आंबेगाव बुद्रुक येथील हरणाई कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये तक्रारदाराचा मुलगा गाडी पार्क करून पायऱ्यांनी घरी जात होता. त्यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूलमधून त्याच्या दिशेने दोन राऊंड फायर केले आणि फरार झाले. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आर्म ॲक्टनुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आंबेगाव पोलिसांच्या तपास पथकाने मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण आणि तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी जांभूळवाडी येथील दख्खन हॉटेलच्या रस्त्यावर पिस्तूल आणि काडतुसांसह थांबल्याची पक्की बातमी मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या भागात सापळा रचून पाचही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.

शिवदत्त उर्फ सोन्या हरीकाका कोंढरे (वय २३, रा. आंबेगाव बु.), श्रेयश रुपेश काटे (वय २३, रा. धायरी फाटा), सूरज सुभाष डिंबळे (वय २३, रा. कल्याण), अतिष उमेश मोरे (वय २८, रा. आंबेगाव) आणि ऋत्विक उर्फ दगडू पांडुरंग बेलदरे (वय २४) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शरद जिने, निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक युवराज शिंदे, अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधूत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवाजी पोटोळे आणि फिरोज शेख यांनी केली.

  • Labels: Ambegaon Police Station, Firing Case Pune, Pistol Seized, Ambegaon Budruk, Pune Police

  • Search Description: Ambegaon Police arrested five habitual criminals involved in a firing case and seized three country-made pistols and four live cartridges.

  • Hashtags: #PunePolice #AmbegaonPolice #FiringCase #PistolSeized #PuneCrimeNews

आंबेगाव बुद्रुक येथील गोळीबार प्रकरणातील ५ सराईत गुन्हेगार जेरबंद आंबेगाव बुद्रुक येथील गोळीबार प्रकरणातील ५ सराईत गुन्हेगार जेरबंद Reviewed by ANN news network on ९/१५/२०२६ ०५:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".