३० वर्षांत १०० हून अधिक वाहन चोऱ्या करणारा सराईत गुन्हेगार राजू जावळकरला पुणे गुन्हे शाखेकडून बेड्या


पुणे, ९ सप्टेंबर २०२६: पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा आणि अहिल्यानगर यांसारख्या विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या ३० वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि १०० हून अधिक वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या रेकॉर्डवरील ६० वर्षीय कुख्यात गुन्हेगाराला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-२ ने सापळा रचून जेरबंद केले आहे. राजू बाबूराव जावळकर (वय ६०, रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, डोणजे फाटा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत वाहनचोराचे नाव आहे.

पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी युनिट-२ कडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान ८ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखेचे अंमलदार शिवानंद कायगुडे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात मागील दोन वर्षांपासून फरारी असलेला आरोपी राजू जावळकर हा डोणजे फाटा परिसरात फिरत आहे.

मिळालेल्या माहितीची शहानिशा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या आदेशानुसार युनिट-२ च्या पथकाने तात्काळ डोणजे परिसरात धाव घेतली आणि सापळा रचून राजू जावळकर यास शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

तपासात उघडकीस आले की, राजू जावळकर हा गेल्या ३० वर्षांपासून पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत वाहनचोर आहे. त्याच्यावर पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये शंभराहून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही धडक कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, निरीक्षक अविनाश माने, सहायक निरीक्षक स्वप्नील लोंढे, उपनिरीक्षक तेजश्री पवार आणि अंमलदार शिवानंद कायगुडे, शंकर नेवसे, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, उज्ज्वल मोकाशी, कुंदन शिंदे, महेश मंडलिक, संतोष टकले, विजय पवार, शंकर कुंभार, संदीप शिर्के, नागनाथ राख, ओमकार कुंभार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे व विनायक वगारे यांच्या पथकाने केली.


  • Labels: Pune Crime Branch, Vehicle Thief Arrested, Raju Jawalkar, Pune Crime News, Bharti Vidyapeeth Police, Serial Auto Thief

  • Search Description: Pune Crime Branch Unit-2 arrested 60-year-old habitual vehicle thief Raju Jawalkar who was involved in over 100 vehicle theft cases across Maharashtra.

  • Hashtags: #PunePolice #VehicleTheft #CrimeBranch #PuneCrime #MaharashtraPolice #LawEnforcement

३० वर्षांत १०० हून अधिक वाहन चोऱ्या करणारा सराईत गुन्हेगार राजू जावळकरला पुणे गुन्हे शाखेकडून बेड्या ३० वर्षांत १०० हून अधिक वाहन चोऱ्या करणारा सराईत गुन्हेगार राजू जावळकरला पुणे गुन्हे शाखेकडून बेड्या Reviewed by ANN news network on ९/१०/२०२६ ०६:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".