शनिवार, १२ सप्टेंबर, २०२६

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा दणका! भारती विद्यापीठ, वाघोली आणि वानवडीतील ८ सराईत गुन्हेगार तडीपार


पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर कडक वचक बसवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील भारती विद्यापीठ, वाघोली आणि वानवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या, शरीराविरुद्ध व मालाविषयी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तसेच अवैध हातभट्टी दारूचा व्यवसाय करणाऱ्या एकूण ८ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये उप-आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
 
१. भारती विद्यापीठ पोलीस ठाणे: ३ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील शरिराविरुद्ध व मालाविषयी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन सराईत आरोपींवर उप-आयुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहिते यांनी २ वर्षांसाठी तडीपारीचे आदेश जारी केले आहेत.

तडीपार करण्यात आलेले आरोपी: १. अजिंक्य संतोष काळे (वय २४, रा. गणेश नगर, आंबेगाव पठार, पुणे) २. सरफराज समीर शेख उर्फ डर (वय २४, रा. एस.आर.ए. कॉलनी, कात्रज, पुणे) ३. महेश उर्फ बंटी विनायक चव्हाण (वय २२, रा. खोपडेनगर, कात्रज, पुणे)

या तिन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) प्रमाणे प्रस्ताव तयार करून सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्यामार्फत परिमंडळ-२ कार्यालयात सादर करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणी घेऊन ४ सप्टेंबर रोजी तिघांनाही २ वर्षांकरिता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड, निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, विशाल वारुळे, श्रीकांत कुलकर्णी आणि स्वप्निल बांदल यांच्या पथकाने केली.
 
२. वाघोली पोलीस ठाणे: ३ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई

वाघोली आणि लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्या ३ सराईतांना उप-आयुक्त परिमंडळ-०७ अबिनास कुमार यांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

तडीपार आरोपी आणि कालावधी: १. दत्ता रंगनाथ गायकवाड (वय २९, रा. दुबेनगर, वाघोली) – १ वर्षासाठी तडीपार, २. महेश देवराम लोंढे (वय २६, रा. दुबेनगर, वाघोली) – ६ महिन्यांसाठी तडीपार, ३. रिना पवन राजपूत (वय ३५, रा. भावडी रोड, वाघोली) – ६ महिन्यांसाठी तडीपार

यातील दत्ता गायकवाड याच्यावर मालमत्तेविषयी आणि शरीराविरोधातील गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर महेश लोंढे व रिना राजपुत यांच्यावर वारंवार बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणे व विक्री करण्याचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. वाघोली पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांत एकूण ७ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

अप्पर आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, उप-आयुक्त अबिनास कुमार, सहाय्यक आयुक्त अनिता मोरे, वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड, निरीक्षक पल्लवी मेहेर, मनोज जगताप आणि सहाय्यक निरीक्षक विजय चंदन यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
 
३. वानवडी पोलीस ठाणे: २ सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी हद्दपार

वानवडी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्हे दाखल असणाऱ्या आणि अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्या २ सराईतांना उप-आयुक्त परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर यांनी २ वर्षांसाठी तडीपार केले आहे.

तडीपार आरोपी: १. मुसा अबु शेख (वय २५, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) – शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध ४ गंभीर गुन्हे दाखल.२. अशोक महादेव राऊत (वय २८, रा. सुरक्षानगर, हडपसर, पुणे) – अवैध दारू विक्रीचे एकूण १० गुन्हे दाखल.

हे आरोपी वारंवार गुन्हे करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचवत असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यामुळे ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये त्यांना २ वर्षांकरिता तडीपार करण्यात आले. वानवडी पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांत ३ एमपीडीए, १ मोक्का, ६ तडीपारी आणि १४० प्रतिबंधक कारवाया करून गुन्हेगारीला पायबंद घातला आहे.

सदर कारवाई अप्पर आयुक्त मनोज पाटील, उप-आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक पंडित रेजितवाड, निरीक्षक कैलास डाबेराव, उपनिरीक्षक समाधान उगले आणि अंमलदार पांडुरंग कदम, यतिन भोसले, शितल आखाडे यांच्या पथकाने केली.


  • Labels: Pune Police, Tadipar Action, Ganesh Utsav 2026, Pune Crime, Bharati Vidyapeeth Police, Wagholi Police, Wanowrie Police

  • Search Description: Pune PoliceExterns 8 habitual criminals from Pune district ahead of Ganesh Utsav under Bharati Vidyapeeth, Wagholi, and Wanowrie police stations.

  • Hashtags: #PunePolice #TadiparAction #GaneshUtsav #PuneCrime #CrimeBranch #LawAndOrder #PuneNews


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा