पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर ३० ऑगस्ट २०२६ रोजी युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर कडून करण्यात आलेल्या धडक कारवाईत २१ किलो १८० ग्रॅम गांजा आणि इतर मुद्देमाल असा एकूण ११ लाख ४४ हजार २१० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नवीन म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर परिसरात ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी पोपट मारुती पाडुळे (वय ५६, रा. नवीन म्हाडा कॉलनी, बिल्डिंग क्र. ११, रूम क्र. १०२) आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
युनिट ६ कडील पथक हद्दीत गस्त घालत असताना महिला हवालदार पल्लवी मोरे आणि अंमलदार बाळासाहेब सकटे यांना गुप्त बातमीदाराकडून मोपेड गाडीवर एका इसमाकडे गांजा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या बातमीच्या आधारे पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन मोपेडवरील बालकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता माल पुरवठादार पोपट मारुती पाडुळे याचे नाव समोर आले. पोलिसांनी पाडुळे याच्या राहत्या घरातून त्याला ताब्यात घेऊन छापा टाकला असता २१ किलो १८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गांजाचा मुख्य पुरवठादार कोण आहे आणि या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष शेटे, सहायक निरीक्षक संतोष कदम, उपनिरीक्षक आशिष जाधव, सहायक फौजदार ज्ञानेश्वर शिर्के तसेच अंमलदार तानाजी देशमुख, समीर पांढरे, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, अमित सस्ते, प्रशांत कर्णवर, गणेश माने, अक्षय बांदल, संतोष राठोड, पल्लवी मोरे व मनीषा लोखंडे यांच्या पथकाने केली.
Labels: Pune Crime, Pune Police, Crime Branch, NDPS Act, Drug Seizure, Wanowrie Police Station, Pune News
Search Description: Pune Police Crime Branch Unit 6 seized 21.18 kg cannabis (ganja) worth Rs 11.44 lakh at New MHADA Colony. Two persons including a minor detained under NDPS Act.
Hashtags: #PunePolice #PuneCrime #DrugSeizure #CrimeBranch #NDPS #PuneNews #GanjaSeized
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा