ईडी अन् सीबीआयच्या नावाने ८ कोटींची खंडणी मागणारे तिघे गजाआड; १० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना गुन्हे शाखेचा दणका



ठाणे, ५ ऑगस्ट २०२६: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सीबीआय, आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) आणि न्यायालयात तक्रारी करून अडचणीत आणण्याची धमकी देत तब्बल आठ कोटी रुपयांची खंडणी मागणारी तीन जणांची टोळी ठाणे गुन्हे शाखा घटक-१ च्या पथकाने उघडीस आणली आहे. १० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना या तिघांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

कळवा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सौरभ नंदकुमार साळवी यांनी 'केशव हाईट्स' या इमारतीच्या मूळ मालकाच्या मृत्यूनंतर केलेल्या नोटरीच्या आधारे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र, या प्रकरणात ईओडब्ल्यू ठाणे यांच्याकडे तक्रार करून ती मागे घेण्यासाठी, तसेच इतर विविध विभागांत तक्रारी न करण्यासाठी संतोष बावडेकर याने साडेचार कोटी रुपये आणि हे प्रकरण कायदेशीर मार्गाने मिटवण्यासाठी सिद्धेश बेंडकोळी, इम्तियाज मोमीन व स्वतःसाठी चार कोटी रुपये, अशी एकूण आठ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

या संदर्भातील तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

निरीक्षक अमोल वालझाडे आणि त्यांच्या पथकाने खंडणीच्या मागणीचे संभाषण मुद्रित करण्यासाठी तक्रारदारास व्हाईस रेकॉर्डर दिले. त्यामध्ये आरोपी स्पष्टपणे खंडणीची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले.

३० जुलै २०२६ रोजी तक्रारदार यांच्या पारसिकनगर, कळवा येथील 'केशव हाईट्स' इमारतीमधील कार्यालयात आरोपी खंडणीचा १० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारण्यासाठी आले असता, सापळा रचून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने संतोष मनोहर बावडेकर (वय ४७, रा. खारीगाव, कळवा, मूळ बेळगाव, कर्नाटक), सिद्धेश हरिश्चंद बेंडकोळी (वय ३५, रा. खारीगाव, कळवा) आणि इम्तियाज इलियास मोमीन (वय ३१, रा. विजयनगर, सांगली) या तिघांना रोख रकमेसह ताब्यात घेतले.

सौरभ साळवी यांच्या तक्रारीवरून कळवा पोलीस ठाण्यात ३ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८(२), ३०८(३), ३०८(६), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असून, निरीक्षक वालझाडे पुढील तपास करत आहेत.

सदर धडक कारवाई वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक निरीक्षक प्रविण फडतरे, चित्रा चौधरी, उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ, दीपक जाधव, रविंद्र पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक सुनिल माने, दयानंद नाईक, हवालदार अविनाश पाटील, नागराज सोनकडे, प्रशांत निकुंभ, व्यंकट धायगोडे, शब्बीर फरास, नंदकुमार पाटील, दीपक जाधव, मुकुंद आव्हाड, संदीप महाडीक, धनंजय आहेर, शिपाई सागर सुरळकर, मयुर लोखंडे, अमोल ढावरे, प्रशांत लवटे, महिला हवालदार दिपाली जाधव, मलिका बहिरम आणि चालक हवालदार शशीकांत सावंत यांनी केली.

Labels:

Thane Crime News, Thane Police, Extortion Case, Crime Branch Thane, Maharashtra News, Real Estate Crime

Search Description:

Thane Crime Branch arrests three individuals for demanding Rs 8 crore extortion from a builder by threatening false complaints to ED, CBI, and EOW.

Hashtags:

#ThanePolice #CrimeBranch #ExtortionArrest #ThaneCrime #MaharashtraPolice #PoliceNews



ईडी अन् सीबीआयच्या नावाने ८ कोटींची खंडणी मागणारे तिघे गजाआड; १० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना गुन्हे शाखेचा दणका  ईडी अन् सीबीआयच्या नावाने ८ कोटींची खंडणी मागणारे तिघे गजाआड; १० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना गुन्हे शाखेचा दणका Reviewed by ANN news network on ८/०८/२०२६ ०५:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".