पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे खोटे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या राजश्री राजेश तुडयेकर (वय ४२, रा. बेळगाव, कर्नाटक) या महिलेला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने कर्नाटकातून अटक केली आहे. सदर महिला आरोपी सध्या १० ऑगस्ट २०२६ पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
आरोपी महिलेने शिवाजीनगर परिसरात 'रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग' नावाने कार्यालय सुरू केले होते. कंपनीत १ लाखापासून ते १०० कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक स्वीकारली जाते आणि त्यातील ३० टक्के रक्कम शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवून उरलेली ७० टक्के रक्कम सुरक्षित ठेवली जाते, असा दावा केला जात होता. या योजनेतून मोठा परतावा मिळेल असे खोटे आमिष दाखवून तिने अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ०२/२०२६ भादवि कलम ४०६, ४०९, ४२० सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ (MPID) कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल आहे. प्राथमिक तपासात फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याचे उघड झाले आहे.
वरिष्ठ निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी आवाहन केले आहे की, रॉयल ट्रेडिंग कंपनीमध्ये पैसे गुंतवून फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपआयुक्त कृषीकेश रावले, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, अंमलदार तेजस चोपडे, आदेश चलवादी, नलिनी क्षीरसागर, सोनाली सुतार व तांत्रिक विश्लेषक अविनाश दरवडे यांच्या पथकाने केली.
Labels: Investment Fraud, Pune Crime News, Shivajinagar Police, MPID Act, Royal Forex TradingSearch Description: Shivajinagar Police arrested a woman from Belgaum for cheating investors with fake high-return schemes through Royal Forex Trading.
Hashtags: #PuneFraud #InvestmentScam #ShivajinagarPolice #PuneNews #MPID
गुंतवणुकीवर ३० टक्के परताव्याचे आमिष दाखवून फसवणूकl; महिलेला बेळगावातून अटक
Reviewed by ANN news network
on
८/२३/२०२६ ०३:०१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: