पवई पोलीस ठाण्याचे पथक आरे रोडवरील मोराजीनगर, मिठी नदी नाल्याजवळ गस्त घालत असताना मुबारक मोमीन खान उर्फ लालू (वय ३२) हा राहत्या घराजवळ संशयितरीत्या फिरताना आढळला. तो मुंबई शहर व उपनगरातून तडीपार असतानाही बेकायदेशीरपणे वावरत होता.
पोलिसांनी एन.डी.पी.एस. कायद्यानुसार त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ५५.१ ग्रॅम 'एमडी' (किंमत रु. ८,८०,०००/-), ४७,८५० रुपयांची रोख रक्कम आणि १०,००० रुपयांचा मोबाईल असा एकूण ९,३७,८५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. आरोपीविरोधात गु.र.क्र. ९०६/२०२६ कलम ८(ब) सह २२(क) एन.डी.पी.एस. अॅक्ट व कलम १४२ मपोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह-आयुक्त मनोजकुमार शर्मा, अप्पर आयुक्त अभिनव देशमुख, उप-आयुक्त दत्ता नलावडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Labels: Powai Police, MD Drugs, Crime News, Tadipar Goon Arrest, Mumbai Crime
Search Description: Powai Police arrested externed criminal Mubarak Khan alias Lalu with 55.1 grams of MD drugs and cash totaling Rs 9.37 Lakhs.
Hashtags: #PowaiPolice #DrugBust #MDFact #MumbaiCrime #LawAndOrder
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा