पिंपरी-चिंचवड: पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक स्थिर, सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकाराने महावितरण प्रशासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केवळ निगडी आणि प्राधिकरणापुरते मर्यादित न राहता आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर, शाहूनगर, संभाजीनगर या संपूर्ण मतदारसंघातील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.
नागरिकांना वारंवार भेडसावणारे तांत्रिक बिघाड, फिडरवरील भार, जुन्या केबल्सची समस्या तसेच डीटीसी (DTC) यार्डांमधील अडचणी दूर करण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ठरलेल्या कृती आराखड्यानुसार अनेक कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत.
निगडी व प्राधिकरण विभागात प्रत्यक्ष कामे पूर्ण
निगडी शाखेंतर्गत २२ के.व्ही. प्रकाशगड फिडरचे संपूर्ण लाईन मेंटेनन्स करण्यात आले आहे. वीजपुरवठ्यात बिघाड झाल्यास तातडीने मार्ग बदलून पुरवठा सुरळीत करता यावा यासाठी २ नवीन जीओडी (GOD - Gang Operated Switch) बसविण्यात आले आहेत. तसेच ३० डीटीसी यार्डमधील झाडांची छाटणी आणि गवत साफसफाईचे काम पूर्ण झाले आहे.
प्राधिकरण शाखेत २२ के.व्ही. टेल्को, २२ के.व्ही. D-३ आणि २२ के.व्ही. रसटन फिडरचे मेंटेनन्स पूर्ण करण्यात आले आहे. येथे ४ ठिकाणी जीओडीचे मेंटेनन्स, ३ नवीन जीओडीची उभारणी, १० खराब झालेले फिडर पिलर बदलणे, १३ ठिकाणी बॉक्स मेंटेनन्स आणि १४ डीटीसी यार्डची स्वच्छता करण्यात आली आहे.
जुन्या केबल्सऐवजी नवीन एलटी केबल्स अन् पर्यायी वीजपुरवठा
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुरुदत्त मंदिर, होंडा शोरूम आणि गोदावरी शाळा परिसरातील जुन्या केबल्स बदलून नवीन एलटी (LT) केबल्स टाकण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत वीज दीर्घकाळ खंडित राहू नये, यासाठी २२ के.व्ही. D-३ फिडरचा पुरवठा २२ के.व्ही. टेल्को फिडरवरून 'बॅक फिड' (Back Feed) करण्यासाठी ७० मीटर नवीन २२ के.व्ही. केबल टाकण्यात आली आहे. यामुळे D-३ फिडरमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवल्यास पर्यायी फिडरद्वारे तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करणे शक्य होणार आहे.
मनुष्यबळ, साधनसामग्री आणि तक्रार निवारण समन्वय
देखभालीच्या कामांसाठी महावितरण कर्मचाऱ्यांना आवश्यक टीॲण्डपी (T&P) साधनसामग्री, एचटी व एलटी केबल्स आणि अतिरिक्त मेंटेनन्स एजन्सी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निगडी शाखेत सहाय्यक अभियंतापदी महादेव मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून स्वतंत्र शिडी गाडी उपलब्ध करून देण्यास मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली आहे.
तक्रारींच्या जलद निवारणासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता महाजन (प्राधिकरण), शाखा अभियंता मुंडे (निगडी), अतिरिक्त कार्यकारी अभियंता शिर्के (आकुर्डी), शाखा अभियंता सोबळी शिंदे (चिंचवड) आणि कार्यकारी अभियंता लहाने (भोसरी) यांचा समावेश असलेला व्हॉट्सॲप समन्वय गट तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Labels: Pimpri News, MSEDCL, Amit Gorkhe, Power Infrastructure, Pimpri Chinchwad, Maharashtra News
Search Description: MSEDCL upgrades power distribution infrastructure in Pimpri constituency following initiative by MLA Amit Gorkhe. Feeder maintenance, new LT cables, and alternative supply arrangements completed.
Hashtags: #PimpriNews #MSEDCL #PimpriChinchwad #PowerGridUpgrade #AmitGorkhe #InfrastructureUpdate
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा