पुणे (विशेष प्रतिनिधी): सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात फटाका सायलेंसरच्या बुलेट चालवून दहशत निर्माण करणाऱ्या आणि रस्त्यावर वाढदिवस साजरा करून वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या हुल्लडबाजांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्याने विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत फटाका बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करत सायलेंसर जप्त करण्यात आले असून रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या चार तरुणांवर गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महंमद पैगंबर जयंतीच्या अनुषंगाने कोंढवा परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कोंढवा पोलिसांचे विशेष पथक गस्त घालत होते. गस्ती दरम्यान पोलीस अंमलदार सुरज शुक्ला व संतोष बनसुडे यांना काही युवक फटाका सायलेंसरचा वापर करून मोठ्या आवाजात गाड्या चालवत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत या वाहनांमधील बेकायदेशीर सायलेंसर काढून घेतले आणि संबंधित चालकांवर कायदेशीर खटले दाखल केले.
त्याचप्रमाणे कोंढवा हद्दीत काही युवकांनी सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला होता. या व्हिडिओची गंभीर दखल घेत पोलिसांनी शोध घेऊन चारही तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व इतर कलमांनुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर शांततेचा भंग करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर पावले उचलली जातील, असा इशारा कोंढवा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांना असा कोणताही प्रकार आढळल्यास त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त संजय दराडे, अप्पर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस, निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी, प्रशांत मंडले, उपनिरीक्षक रविंद्र गावडे, सागर पवार, सहाय्यक फौजदार शरद वाकसे आणि अंमलदार अमोल हिरवे, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे व पथकाने केली.
Labels: Kondhwa Police Station, Pataka Bullet Action, Road Birthday Crime, Pune Police Special Campaign, Pune News
Search Description: Kondhwa Police launched a special drive against silencer modified bullets and youth celebrating birthdays on public roads in Pune.
Hashtags: #KondhwaPolice #PatakaBullet #PunePolice #ActionAgainstRowdies #PuneNews #LawAndOrder
कोंढव्यात फटाका बुलेट अन् रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांची धडक कारवाई
Reviewed by ANN news network
on
८/२९/२०२६ ०६:११:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: